अद्भुत भाग 7

Submitted by Mandar Katre on 1 March, 2013 - 23:46

7

रोहनने मुंबई सोडल्यापासून तो एकामागोमाग एका दिव्य अनुभवातून जात होता. त्याला स्वत:लाच विश्वास बसत नव्हता ,इतका बदल त्याच्यात झालेला होता. पुंनर्जन्म होवून एखादा नवीन मी जन्माला यावा ,तसा तो आता स्वत:कडे नवीन दृष्टीकोणातून बघत होता. अॅलेक्सला त्याने तसे सांगितलेही . मात्र पूर्वजन्माच्या प्रयोगाबद्दल मात्र गुरुजींच्या सक्त सूचनेनुसार त्याने अॅलेक्सला काहीही संगितले नव्हते. असे का?म्हणून गुरुजींना विचारताच ते म्हणाले ............प्रत्येकाची जाणीव पातळी आणि कार्मिक सायकल मधली (उत्क्रांती-चक्र) पातळी निराळी असते .त्यानुसार कोणाला दिव्य अनुभव कधी यावेत ,हे ठरलेले असते रोहन बेटा .त्याची पातळी जशी वाढेल,तशी त्यालाही अनेक अनुभव येतील. सध्या मी देतो ती आणखी काही पुस्तके तू वाच! .... असे म्हणून त्यांनी परमहंस योगानंद लिखित योगकथामृत हा ग्रंथ त्याला वाचायला दिला .तो ग्रंथ वाचताना रोहन गुंगून गेला.

रोहनने गुरुजींना विपश्यना शिबिरात आचार्यांनी दिलेलेपत्र दिले. ते वाचून मंद स्मित करून गुरुजी म्हणाले, रोहन, तुला विपश्यना आणि इथे आलेल्या अनुभवात खूप फरक आहे ना?........होय. तो म्हणाला. म्हणूनच मी तुला T Lobsang Rampa यांची पुस्तके वाचायला दिली होती. आम्ही पारंपरिक Buddhism पासून थोड्या वेगळ्या प्रकारची साधना करतो. हा पंथ T Lobsang Rampa यांच्या शिकवणुकी नुसार चालतो. त्यांनी लावलेले आध्यात्मिक शोध अद्वितीयच आहेत. आज आपण एक नवीन तंत्र अभ्यासणार आहोत. त्याला Future Progression असे म्हणतात.अमेरीकेतील काही तज्ज्ञ संशोधक आणि Hypnotists यांनी हे तंत्र शोधून काढले आहे.

दुसर्याा दिवशी पहाटे तीन वाजता पुन्हा गुरुजींनी त्याला उठवले. ध्यानाच्या गुंफेत गेल्यावर परत कालप्रमाणेच सम्मोहन सुरू झाले. ......

मी 1 ते 10 अंक म्हणतो.... आता तू भविष्यात जाणार आहेस. हे 2236 साल आहे.तुझ्या आसपास जे घडत आहे ते मला सांग पाहू.......................

तुझे नाव काय?

बार्बरा पुखरेस्ट

तुझे वय काय?

134 वर्षे

मी न्यू टेक्सास अंडरवॉटर सिटीमध्ये असते.

तुझ्या नावावरून तू एक स्त्री आहेस हे मी ओळखले. तुला मी बार्बरा म्हणून हाक मारू का?

हो चालेल ना.

तुझे वय इतके जास्त कसे? आणि तुम्ही पाण्याखाली कासेकाय राहता?

इ.स.2120 साली लागलेल्या काही आश्चर्यकारक वैज्ञानिक शोधांमुळे मानवाचे आयुर्मान वाढले होते . सध्या मानवाचे सरासरी आयुर्मान 200 वर्षे आहे. कॅन्सर आणि एड्स सारख्या रोगांवर आता गोळ्यांचा तीन महिन्यांचा एक कोर्स पुरा केल्यास कॅन्सर आणि एड्स सुद्धा बरे होतात.

मृत्युचे प्रमाण कमी झाल्याने आणि वयोमान वाढल्याने पृथ्वीवर लोकसंख्या बेसुमार वाढली . आणि त्यामुळे सर्वांना राहायला,पोसायला जमीन कमी पडू लागली. त्यामुळेच अंडरवॉटर आणि अंडरग्राऊंड सिटीज बनवल्या गेल्या.

................

क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users