युवांकुर : धमाल मनोरंजनाचा रंगारंग कार्यक्रम

Submitted by अजय on 1 March, 2013 - 14:58

गाणी, नाच , नाट्य, विनोद यांनी नटलेला एक धमाल कार्यक्रम १६ व्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात.

Yuvankur.jpg

सूत्रसंचालनः अभिजीत खांडकेकर
http://bmm2013.org/ipc-yuvankur.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैभव आणि अतिशा नाईक यांनी धम्माल आणली.
फु बाई फु मधे आवडलेली काही Scripts इथे होती (उध्धट लग्नाचा हॉल...)
भाग्यश्री चिरमुले यांचे नाच छान होते. त्यांना एकादं script दिलं असतं तर अजून मजा आली असती.
खांडकेकर यांचं होस्टींग पण मस्त होतं. कार्यक्रम त्यामुळे Non-stop चालू राहीला.
मधे त्यांनी 'प्रेम' या विषयावर प्रेक्षकांच्या मुलाखती घेतल्या. धम्माल आली. एका प्रेक्षकाने तालिबानी उखाणा घेऊन धक्का दिला.. (आश्चर्याचा की भीतीचा हे तुम्ही ठरवा)...

विमानातून पडला बाँब, बोटीचा झाला चुरा....'
अमुक तमुक बायको माझी, तीच खरा हिरा....'

'अरे बापरे.. तालिबानी वाटतोय..' माझे उद्गार...
हिरा ला 'शिरा', 'पुरा', 'नरा', 'वानरा', 'सहचरा' असे बरेच सखे सोबती असताना 'बोटीचा चुरा' करायची कल्पना भारी होती..

बाकी 'नाच' या विषयावर मी बोलू नये.. हेच बरं Happy

उ. का. आणि प्रि. बा. यांनी (नेहमीप्रमाणे) आपण प्रेमात आहोत हे दाखवलं. काही गाणी ही नाचून दाखवली. 'गोड दिसणे' ही पण एक कला आहे आता.. Happy

अ. वि. हा कुणाच्या हृदयाची धडकन की धडक काहीतरी आहे म्हणे.. तो 'दंबग' मोड मधे सलमान होता.
'बारा महिनेमें बारा तरीके..' वगैरे नाचून किंवा हाताचे, पायाचे, पँटचे प्रकार करून दाखवले त्याने. 'हे तो का करतोय'.. असं माझ्या शेजारच्या आजीनी मला विचारलं. मी म्हटलं 'धडकन' अजून कशी दाखवणार म्हणून पँटचे खिसे हलवत असावा..

(सिरीयल बघणार्‍या मंडळींची क्षमा मागून)....

गोष्टीगावाचे, ते माझे बाबा होते Happy
सोनाली कुलकर्णीचे पर्फोरमन्सेस जबरदस्त होते. अतिषा नाईक, वैभव मांगले रॉक्स!

अतिषा नाईक, वैभव मांगले रॉक्स! >> +१. वैभव मांगले बरोबर ऑम्नीच्या चेक इन काउंटर वर सिस्टीम डाऊन असल्यामूळे गप्पा मारल्या होत्या तेंव्हा पण धमाल आली होती. (तेंव्हा वैभव मांगले कोण हे मला माहित नव्हते तरिही) Wink