माध्यम प्रायोजक उपक्रमासाठी स्वयंसेवक हवेत

Submitted by admin on 1 March, 2013 - 14:00

जुलै २०१३मध्ये प्रोव्हिडन्स येथे भरणार्‍या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठी माध्यम प्रायोजक म्हणून आपली निवड झाली आहे. तसेच येत्या काही महिन्यांत ४/५ दर्जेदार मराठी चित्रपटांचे माध्यम प्रायोजक आपण असणार आहोत. त्यासाठी काही स्वयंसेवकाची आवश्यकता आहे.

अधिवेशनाला येणार्‍या मान्यवरांच्या तसेच चित्रपटाशी संबंधित तंत्रज्ञ व कलाकारांच्या (प्रत्यक्ष भेटून अथवा फोनवरून) मुलाखती घेणे, मुलाखतींचं शब्दांकन करणे, स्पर्धा / खेळ आयोजित करणे, घोषणा लिहिणे अशी कामं माध्यम प्रायोजक करतात. माध्यम प्रायोजक ग्रुपात सहभागी होण्यासाठी तुम्ही भारतातच असला पाहिजेत, अशी अट नाही.

माध्यम प्रायोजक ग्रुपात सहभागी होण्याची इच्छा असल्यास कृपया इथे आपली नावं नोंदवा. प्रत्येक चित्रपटासाठी आपण वेगळा ग्रूप तयार करतो. तसंच बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठीच्या कामासाठीही वेगळा ग्रूप असेल. त्यामुळे आवश्यकतेनुसार तुमच्याशी संपर्क साधला जाईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्दांकनाचं काम करायला नक्की आवडेल आणि जमेलही.
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठीच्या कामासाठीही मदत करायला आवडेल. मात्र त्यासाठी अधिवेशनाला जाणे मस्ट आहे का?

मलाही काम करायला आवडेल. मात्र मला सतत मायबोलीवर, इमेलवर संपर्कात राहणे शक्य नाही. परंतु, २ दिवसात टंकलेखन करणे, थोडे फार मुशो करणे, माप्रांच्या इथल्या कार्यक्रमांच्या कल्पनांवर चर्चेत भाग घेणे जमू शकेल. थोडक्यात, बॅकस्टेजला असणे चालेल. Happy

नमस्कार
.ऑनलाईन काही करायचे असल्यास सांगा........ मला कुठे ही जाता येत नाही .. Sad
थोडक्यात काय......मी पडद्यामागे उभा राहिन Happy

अरे वा.. मि हि आहेच कि.. काहिहि सान्गा.. आपली तयारी आहे.. आनि थोडा फार अनुभव हि काँलेजच्या वक्ताचा.. जमात मा..

Pages