तज्ञांकडुन मदत हवी आहे.
एका सहकारी बँकेला internet banking अंमलात आणायची आहे. अर्थात त्यासाठी संगणक प्रणाली आणि स्टोरेज ह्या दोन्ही पुरवणार्या कंपन्यांच्या संपर्कात ते आहेत.
बँकीत क्षेत्रात जरी थोडे फार अनुभवी असले तरी संगणक क्षेत्रात ते नवखेच आहेत.
संपर्कात आलेल्या vendors कडुन काही लाख ते काही हजार असे काही पण quotes आले आहेत.
सध्या बँकेची फक्त १ शाखा आहेत. पुढे मागे कदाचित वाढतील पण सध्या फक्त २ शाखांबद्दल विचार चालु आहे
कृपया मदत कराल का?
- संगणक प्रणाली / data storage ह्या साठी साधारण किती किंमत असते.
- वरील सर्व्हिस पुरवणार्या नावाजलेल्या/खात्रीलायक संस्था कोणत्या?
- त्या बँकेला aggrement sign करण्यापुर्वी काय काय खबरदारी घ्यावी लागेल? (उदा. vendor ने राबवलेली security, backup data center etc)
अजुन काही सुचना असतील तर त्या बँकेला उपयोगीच पडतील.
कुणाला अधिक माहिती असेल तर मी तुम्हाला संपर्क करु शकेन.
तुझ्या प्रश्नांची उत्तरं इतकी
तुझ्या प्रश्नांची उत्तरं इतकी सोपी नाहीयेत.
त्यांच्या किती शाखा आहेत? त्या सगळ्यांचं संगणकीकरण करायचं आहे का? त्यांचं वेगवेगळं संगणकीकरण करायचं आहे की एकच सेंट्रल सोल्युशन हवंय? असे अनेक प्रश्न आहेत त्यात.
इन्फोसिसचं एक प्रॉडक्ट होतं पूर्वी, अजूनही ते विकत असावेत.
महागुरू, आम्ही हेच करतो ईथे.
महागुरू, आम्ही हेच करतो ईथे. पण भारतातील किंमती आणि संस्थांची माहिती नाही.
पण खबरदारी अशी घेता येईलः
१. Hosted solution OR On-premise. Hosted मध्ये Internet banking vendor कडे सर्वर्स होस्ट केलेले असतील. DR, security ची जबाबदारी पण Internet banking vendor ची असेल. On-premise असेल तर सर्वर्सची जबाबदारी बँकेची असेल. Hosted मध्ये दरमहिना जास्त पैसे vendor ला द्यावे लागतील, पण बँकेला सर्वर maintenance करता डेडीकेटेड लोकं ठेवावी लागणार नाहीत.
२. Project scope नीट विचार करून फायनल करायला लागेल सही करण्या पूर्वी. Check Imaging, Check Reorder, Account Opening, eStatements हे बरेचदा third party vendor कडे असतात आणि internet banking मधुन Single-signon करावे लागते. तर हे सगळे SSO काँट्रॅक्ट्मध्ये समाविष्ट केले तर बरे पडते. कारण काँट्रॅक्ट्मध्ये नसेल आणि नवीन requirement आली तर आम्ही भरमसाठ पैसे चार्ज करतो
३. Internet banking vendor चा डेमो नीट लक्ष देऊन योग्य लोकांनी पाहिला पाहिजे. जर काही गोष्टी त्यांच्या Out-of-the-box solution मधुन बँकेला हव्या तशा साध्य होत नसतील, तर ते त्यांना customization म्हणुन करता येईल का आणि त्याचे किती पैसे जास्त होतील ते बघावे. शक्यतो negotiate करून काँट्रॅक्ट्मध्ये समाविष्ट करून घ्यावे. Implementation phase मध्ये नक्कीच त्याच रिक्वेस्टचा कोट जास्त येईल.
४. Data Conversion: हे ह्यांना लागू पडणार नाही ९९%, कारण आधी Internet banking नसल्यामुळे हा डेटाच नसेल. Internet banking launch होईल त्या दिवशी मेंबर्सचा काय-काय डेटा त्यांना लॉगीन करतील तेंव्हा दिसला पाहिजे, त्यातील कुठला डेटा real time fetch केला जाईल, कुठला launch च्या आधी pre-load केलेला असेल ह्या सगळ्याचा नीट विचार करणे गरजेचे आहे. For example: Scheduled Transfers, Scheduled bill payments, Transfer history, alerts etc. पण असेल तर Data Conversion चे वेगवेगळे elements काँट्रॅक्ट्मध्ये समाविष्ट करून घ्यावे.
चिमण, धन्यवाद. त्यांची सध्या
चिमण, धन्यवाद. त्यांची सध्या एकच ब्रँच आहे. इंफोसिस बद्दल पण सांगतो.
राखी. >> खुप धन्यवाद. अजुन काही लागले तर संपर्कातुन/ फोन्वर विचारीन.
इंफोसिसचं सॉफ्टवेअर >>
इंफोसिसचं सॉफ्टवेअर >> फिनॅकल.. भारतातल्या बर्याच बँका वापरतात हे.