Submitted by अनिल आठलेकर on 28 February, 2013 - 12:06
रात्र ही सरणार नक्की
जग पुन्हा हसणार नक्की
का दिव्याला व्यर्थ चिंता?
भय उद्या नसणार नक्की.......
शुष्कतेला सांग जा तू
पालवी फुटणार नक्की.........
पेर तू अंधारवाटा
चांदणे पिकणार नक्की.......
भंगुदे तो राजवाडा
झोपडी तरणार नक्की......
लेखणी 'नारायणाची'
आगळी ठरणार नक्की.....
-©अनिल आठलेकर, पुणे("नारायण ')
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह ! नक्कीच आवडली .
वाह !
नक्कीच आवडली .
"शुष्कतेला सांग जा तू पालवी
"शुष्कतेला सांग जा तू
पालवी फुटणार नक्की.........
पेर तू अंधारवाटा
चांदणे पिकणार नक्की......." >>> हे सर्वात आवडले.
पेर तू अंधारवाटा चांदणे
पेर तू अंधारवाटा
चांदणे पिकणार नक्की.......
भंगुदे तो राजवाडा
झोपडी तरणार नक्की......<<<
शेर आवडले. शुभेच्छा!
धन्यवाद
वाह, क्या बात है.....
वाह, क्या बात है.....
वाह अनिलजी फेस्बुकावर 'MKS'वर
वाह अनिलजी
फेस्बुकावर 'MKS'वर वाचली होतीच त्यापेक्षाही इथे पाहताना जास्त आवडली
"नारायण" हे तुमचे तखल्लुस आहे वाटते ....................
अजून गझल्स येवूद्यात
....प्रतिक्षेत

~वैवकु
धन्यवाद मित्रांनो
धन्यवाद मित्रांनो प्रोत्साहनपर प्रतिसादासाठी....
होय वैवकु..
नारायण तखल्लुस आहे.......
पेर तू अंधारवाटा चांदणे
पेर तू अंधारवाटा
चांदणे पिकणार नक्की.......
अप्रतिम शेर..