'तरही' गझल

Submitted by योगितापाटील on 28 February, 2013 - 08:07

'तरही' गझल
कुसुमाग्रजांच्या 'नाते' ह्या कवितेतील एक ओळ घेऊन लिहिलेली 'तरही' गझल

जागा वसंत आहे देतो सुगंध ग्वाही
चाहूल बहरण्याची सरली अजून नाही

ग्रीष्मात श्रावणाचा इतकाच अर्थ होतो
वाऱ्यातुनी तुझा ग प्राजक्त रोज वाही

देऊ नको खुलासे नजरेत दोष यांच्या
'साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही'

बेहोश राहण्याचा केला ठराव आता
व्यापून तू अशी..मी असतो कुठे असाही?

स्वप्ने तुझ्या रूपाने दारात आज आली
आहेस जीवनी तू आता न आस काही

-योगिता पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेहोश राहण्याचा केला ठराव आता
व्यापून तू अशी..मी असतो कुठे असाही?

स्वप्ने तुझ्या रूपाने दारात आज आली
आहेस जीवनी तू आता न आस काही<<< छान

(ठराव च्या जागी सरावही वापरून पाहिले - कृ गै न)

'ग' या अक्षराची एकच मात्रा होते, तेथे मात्रा कमी पडत आहे.

योगिता,
छान गजल. आवडली. ग मुळे आलेला मात्राचा दोष घालवण्यासाठी मी ओळ खालील प्रमाणे वाचली .
वार्‍यातुनी सख्याचा (किंवा सखीचा) प्राजक्त रोज वाही

ह्या अक्षराची एकच मात्रा होते
तसेही तुम्हाला अपेक्षित ग हा शब्द .....गं असा लिहायची पद्धत आहे असा लिहिल्यास त्याच्या २ मात्रा धरता येतील असे मला स्वानुभवावरून वाटते.
निशिकांत काकानी दिलेला पर्यायच योग्य ठरावा कारण 'गं' असे लिहिले तरी ते "भरीचे"च आहे
असे भरीचे शब्द कसलेल्या गझलकाराकडून सहसा टाळले जातात असे मी पाहिले आहे

पु.ले.शु. योगिताजी Happy

sarvanche aabhar vaibhav kulkarni actually tumhi sangitala tasach 'गं' lihayacha hota pan typing madhye durlakshit zala tari to bharicha vatat asel tar nishikant kakancha badal aawadala.

वैवकु शी "गं" च्या बाबतीत सहमत!

अत्यंत सुंदर, अत्यंत तरल गज़ल!

प्रत्येक द्वीपदी आवडली.

ग्रीष्मात श्रावणाचा इतकाच अर्थ होतो
वाऱ्यातुनी तुझा ग प्राजक्त रोज वाही

देऊ नको खुलासे नजरेत दोष यांच्या
'साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही

य दोन खासच!! Happy