Submitted by रसप on 28 February, 2013 - 00:27
कुसुमाग्रजांच्या 'तुर्क' ह्या कवितेच्या आकृतीबंधापासून प्रेरणा घेऊन ही रचना लिहिली आहे.
उदासीनता
एकदाच दे
एका रंगी
कभिन्न काळ्या
जशी रंगते
धुंद होउनी
रात्र रोजची
तशीच अस्सल
शुद्ध वेदना
खरीखुरी दे
कळू नये की
कुठे ठणकते
खपलीखाली
भळभळणाऱ्या
जखमेचीही
नकोच नक्कल
नको आणखी
काही दुसरे
एकटाच मी
माझ्यासोबत
नको आठवण
नकोच वास्तव
कठोर किंवा
दाहक सारे
नको कुणाचे
अलिप्त सांत्वन
थेंब सांडता
फक्त असू दे
डोळ्यावरती
निव्वळ माझी
श्रांत पापणी
बोजड ओली
थोपवेल ती
तिथेच सारी
गाभाऱ्यातुन
व्यक्त व्हावया
उफाळणारी
....... उदासीनता.......... !!
....रसप….
२७ फेब्रुवारी २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/02/blog-post_28.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह - क्या बात है......
वाह - क्या बात है......
सुंदर. आकृतिबंधाला
सुंदर. आकृतिबंधाला कुसुमाग्रजांचा स्पर्श आहेच पण आशयातून आणि अभिव्यक्तितून त्याला पुरेपूर न्याय दिला आहे तुम्ही. अलीकडे वाचलेल्यातील आठवणीत राहण्याजोगी अशी ही खास आहे.
काहीजण केवळ आकृतिबंधाकडे पाहून 'याच्यासारखे ...त्याच्यासारखे' अशी नाके मुरडतील पण अशांना कदाचित हे कळत नाही की केवळ अनुकरणाने चांगली कविता होत नाही. त्यात स्वतःच्या भावनांचे, अंतर्द्वंद्वाचे काही तेज मिसळलेले असावे लागते. असो. ह्या रचनेला सर्वांकडून योग्य न्याय मिळो ही शुभेच्छा!
ही सुद्धा आवडली.
ही सुद्धा आवडली.
सुंदरच रे जीतू...
सुंदरच रे जीतू...
क्या बात है जितू यमकविरहीत
क्या बात है जितू
यमकविरहीत काव्य होय ना? मस्तच जमतं रे तुला !!
कुसुमाग्रज ते ..'केवळ अनुकरणाने चांगली कविता होत नाही'>>>>>> मिस्टर अमेय काही संबंध आहे तरी का इथे तुम्ही ह्या ओळी प्रतिसादात देण्याचा ?????
वै. व. कु.
वै. व. कु. साहेब,
दुसर्याच्या लिखाणावर तिसर्याने दिलेले प्रतिसाद ' संबंध' शोधासाठी आपल्याकडून 'सेन्सॉर' संमत करून घ्यावे लागतात याची कल्पना नसल्याने हा प्रमाद घडला.
असो, इतक्या चांगल्या कवितेखाली ही राळ उडवणे ठीक वाटत नाही म्हणून इथेच थांबतो.
शेवट आवडला !
शेवट आवडला !
एका छोट्याशा ओळीत/चरणात ८
एका छोट्याशा ओळीत/चरणात ८ मात्रा या वृत्तामुळे
या कवितेतील भाव छान व्यक्त झाला.
हा फॉर्म म्हणजे, (माझ्या मते)
आपण एक एक पायरीने जिना चढत जातो,
काही पायर्यांनंतर मिडलॅंडिंग येतं
पुन्हा पायर्या ..... पुन्हा मिडलॅंडिंग
आणि अखेरीस विविक्षित उंचीवर पोहोचतो.
असा काहीसा.
ही कविताही अशीच पायर्या चढत चढत योग्य उंचीला पोहोचली आहे....... छानच.
--------------------------------------------------------------------------------------------------------
मिडलॅंडिंगला मराठी शब्द माहित नाही.
गुजराथी सुतार/कारागीर 'रमणा' म्हणतात हा अनुभव आहे.
मस्तच, रणजितदा . खूप आवडली .
मस्तच, रणजितदा .
खूप आवडली .
मस्त प्रतिसाद उकाका
मस्त प्रतिसाद उकाका
रणजीत....... सुंदर
रणजीत.......
सुंदर कविता....
फोरम खूप आवडला.........!!
रसप, नेहमीप्रमाणेच छान
रसप, नेहमीप्रमाणेच छान
सुरेख !! मस्त
सुरेख !!
मस्त ओघवती.....आवडलीच
आवडली.
आवडली.
छान !! आवडली!!
छान !! आवडली!!