भाव सरणाचे वधारू लागले

Submitted by प्राजु on 26 February, 2013 - 12:48

वादळे येता थरारू लागले
कोणत्या काठास तारू लागले

सूर्य किरणांचा करूनी कुंचला
वाट मी माझी चितारू लागले

माळ घालुन चालले वारीस मी
वागणे माझे सुधारू लागले

पालवी, मोहोर पाने अन फ़ुले
का ऋतू-चक्रा झुगारू लागले?

नाव ज्यांनी टाकले माझे कधी
ते खुशालीही विचारू लागले

पाहुनी आभाळ मातीच्या उरी
बीज अंकुर बघ तरारु लागले..

देह ठेवू की नको मज ना कळे
भाव सरणाचे वधारू लागले

-प्राजु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे रचना प्राजक्ताजी.....आवडली मला.....

माळ घालुन चालले वारीस मी
वागणे माझे सुधारू लागले

देह ठेवू की नको मज ना कळे
भाव सरणाचे वधारू लागले<<<

आवडले

आवडली

सूर्य किरणांचा करूनी कुंचला
वाट मी माझी चितारू लागले

माळ घालुन चालले वारीस मी
वागणे माझे सुधारू लागले

देह ठेवू की नको मज ना कळे
भाव सरणाचे वधारू लागले

>>>>>>>>>हे तीन् सर्वाधिक आवडले
('सूर्यकिरणांचा' असा एकसंध शब्द हवा )

वादळे येता थरारू लागले
कोणत्या काठास तारू लागले

सूर्य किरणांचा करूनी कुंचला
वाट मी माझी चितारू लागले

हे आणि शेवटचा शेर आवडले, छान आहे

माळ घालुन चालले वारीस मी
वागणे माझे सुधारू लागले

देह ठेवू की नको मज ना कळे
भाव सरणाचे वधारू लागले

दोन्ही शेर अप्रतिम आहेत...

शुभेच्छा.