आठवांचा पसारा....

Submitted by योगितापाटील on 26 February, 2013 - 10:53

आठवांचा पसारा....पुन्हा एकदा
वेदनांना धुमारा....पुन्हा एकदा

जाहला का तुझा स्पर्श मज सांग ना
कातळाला शहारा...पुन्हा एकदा

दे निखाऱ्यास फुंकर जराशी तुझी
गारठ्याला उबारा...पुन्हा एकदा

सांत्वने ती पुरे फक्त डोळ्यातली
काळजाला सहारा...पुन्हा एकदा

ध्वस्त आतून झालो कितीदा तरी
वादळाला निवारा...पुन्हा एकदा

दाटल्या खूप भरती तळाशी अता
आसवांना किनारा...पुन्हा एकदा

स्वैर गंधाळतो मोगरा तो म्हणे?
घातला मी पहारा...पुन्हा एकदा

-योगिता पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाहला का तुझा स्पर्श मज सांग ना
कातळाला शहारा...पुन्हा एकदा

दे निखाऱ्यास फुंकर जराशी तुझी
गारठ्याला उबारा...पुन्हा एकदा

हे दोन शेर आवडले..

शुभेच्छा...

जाहला का तुझा स्पर्श मज सांग ना
कातळाला शहारा...पुन्हा एकदा..........जियो यार .....!!

ध्वस्त आतून झालो कितीदा तरी
वादळाला निवारा...पुन्हा एकदा..............जबरी !!

खरं तर प्रत्येक शेरच भारी आहे..... !!

गझल फार फार आवडली !!

योगुली | 27 February, 2013 - 23:33>>>>

हे..............योगुली...........कित्ती दिवसांनी तुझा प्रतिसाद वाचतोय् होतीस कुठे इतके दिवस ???
Happy