एग्ज बेनेडिक्ट ऑन क्रॅब केक विथ हॉलंडाइज सॉस (फोटोसहित)

Submitted by तराना.. on 25 February, 2013 - 19:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

>पोच्ड एग्ज साठी
६ अंडी
१ चमचा व्हिनेगर
>क्रॅब केक साठी
१/२ पाउन्ड ताजे क्रॅब मीट
१/२ लिंबू
१ चहाचा चमचा तिखट
२ कांदेपात बारिक चिरून
१/४ कप लाल सिमला मिरची बारिक चिरून
१-२ लसूण पाकळ्या
२ चमचे मेयोनीज
१ अंडे फेटून
व्हिट क्रॅकर्स
१ चमचा Worcestershire sauce ( एच्छिक)

> हॉलंडाइज सॉस साठी
२ अंड्यातील पिवळे
१ कप बटर
> इंग्लिश मफिन्स किंवा ब्रेड भाजून

क्रमवार पाककृती: 

नावे मोठी मोठी असली तरी पाककृती सोपी आहे. Happy

अगोदर क्रॅब केक ची तयारी करा. थोडे व्हिट क्रॅकर्स मिक्सर मधून बारिक काढून घ्या. .साधारण १/२ कप क्रॅकर्स ची पूड घाला. क्रॅकर्स ची चव बघून मिश्रणात मीठ किती लागेल ते ठरवा. किंचितच लागेल. आता वरील क्रॅब केक चे सर्व जिन्नस एकत्र करा. फ्रि़ज मध्ये १/२ तास ठेवा. नंतर मिश्रणाचे साधारण ६ बर्गर थापा.फार नाजूक आकार नको. हे क्रॅकर्स पूड मध्ये घोळवा. साधारण १/२ वाटी तेल एका पॅन मध्ये घेउन मंद आचेवर ३-४ मिनीटे प्रत्येक बा़जू वर तळा. नंतर टिश्यू पेपर वर काढा

पोच्ड एग्जः
एका पसरट पॅन मध्ये पाणी उकळायला घ्या. १ उकळी आली की आच मंद करा. पाण्यात १ चमचा व्हिनेगर व किंचित मीठ घाला. आता एक अंडे वाटीत फोडा व हळूच पाण्यात सोडा. असे सर्व ६ अंड्यांसाठी करा. साधारण ३ मिनिटे पाण्यात ठेवा. नंतर टिश्यू पेपर वर काढा.

हॉलंडाइज सॉस:
१ बाउल व १ भांडे असे लागतील जे एकावर एक बसतात. भांड्यात थोडेसे पाणी उकळत ठेवा.
बाउल मध्ये २ अंड्यातील पिवळे फेसा. किंचित लिंबू पिळा. चिमूट भर मीठ व साखर ही घाला. आता हा बाउल पाण्याच्या भांड्यावर ठेवा. बाउल ला पाण्याचा स्पर्श होता कामा नये. आता सतत ढवळत रहा व हळू हळू बटर सोडा. ५ मिनिटात सॉस तयार !

एग्ज बेनेडिक्ट म्हणजे.... इंग्लिश मफिन वर क्रॅब केक वर पोच्ड एग वर हॉलंडाइज सॉस असे रचून खाणे. ( हो ... नाहितर लोकांना प्रश्न पडेल की लिहिले आहे एग्ज बेनेडिक्ट आणि आता हे पोच्ड एग काय ! )

बरोबर पोटॅटो वेजेस व सलाड द्या.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी २ या प्रमाणे ३ जणांसाठी भरपूर
अधिक टिपा: 

नुकताच हा पदार्थ एका रेस्टॉरंट मध्ये खाल्ला. मला अतिशय आवड्ला म्हणून करून बघितला. हे सगळे पदार्थ एकत्र खूप छान लागतात. पांरपारिक बेनेडिक्ट मध्ये क्रॅब केक एवजी बेकन वापरतात. हा अतिशय पोट भरीचा प्रकार आहे. हॉलंडाइज सॉस साठी भरपूर बटर लागते. याचे जरा लो कॅलरी स्वरूप शोधायला हवे. क्रॅब केक हे फार नाजूक असतात ते काळजीपूर्वक तळावेत. फारसे काहीच अवघड नाही. या विकांताला करून बघा.

माहितीचा स्रोत: 
आंतरजाल
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

फोटोसहीत लिहिलंय आणि फोटो नाही? फशिवत्यात! Happy

ओशन्स एलेव्हनमधे टेस तिला एग्ज बेनेडिक्ट आवडतात असं सांगते ते आठवलं.

मीही फोटोसाठीच आले होते. आता संपादित करताना प्रत्येक स्टेपचे फोटो टाकावे. मला पोच्ड एग्ज ही स्टेप नीट नाही कळली.