तुज बघता..

Submitted by प्रसाद पासे on 25 February, 2013 - 05:51

संदीप खरेंची माफी मागुन. हे विडंबन पोस्ट करत आहे.

प्रसंगः बाइकवरुन जाताना रस्त्यात दिसलेली सुन्दर सुबक ललना पाहण्यात रमलेला असताना झालेला अपघात.

तुज बघता माझा अपघात जाहला होता
अन देहावरचा प्रत्येक अंग सुजला होता

रमलो होतो पाहण्यात तुला मी इतका
तितक्यात कारला जोरात ठोकला होता

तालात वाजली कानफडात इकडे
अन जोरात आवाज निनादला होता

डोळ्यांसमोर दिसले भर दिवसा तारे
कारचा मालक समोर उभा ठाकला होता

सांभाळता वेदना असह्य अंगावरती
अन कारचा मालक रागाने पेटला होता

तू बघताच माझे तोंड पडले होते
तुझ्या पुढे त्याने मला फोडला होता

पाहिले जगाने माझे समोर हसे
माणूस तो पोटधरून हसला होता

पडलो चक्कर येउन तिथे मी
अंती मी देह स्ट्रेचरवर ठेवला होता

प्र.रा.पासे

Group content visibility: 
Public - accessible to all site users