हिंदी/मराठी चित्रपटगीत आणि लोकेशन

Submitted by जिप्सी on 25 February, 2013 - 00:41

हिंदी/मराठी चित्रपटगीत मग ती जुनी असो वा नविन न आवडणारा विरळाच आणि त्यात भटकंती म्हणजे सोने पे सुहागाच. बर्‍याचदा असे होते कि आपण एकदा ठिकाणी भटकंती जातो तेंव्हा कधी कधी असे वाटते कि हि जागा पूर्वी आपण नक्की कुठेतरी पाहिलीय. थोडा अधिक विचार केल्यावर आठवतं कि अरे हां, हे तर अमक्या अमक्या गाण्यातील लोकेशन आहे.

तेंव्हा मंडळी गाणी आणि भटकंती या दोन गोष्टींची आपण एकत्रित सांगड घालुया. तुमचं एखादं आवडतं गाण आणि त्याचे लोकेशन (भारतातील्/परदेशातील) इथे शेअर करायचे आहे (जरी गाणं आवडीच नसेल पण लोकेशन आवडत असेल तरीही चालेल Happy ). गाण्याची यु ट्युब लिंक असेल तर अधिक चांगले.

उदा.
१. तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा नही
चित्रपटः ऑंधी
लोकेशनः सुरूवातीला अवंतीपुरा मंदिर (अवंतीपुर - श्रीनगर) आणि नंतर मुघल गार्डन (श्रीनगर)
यु ट्युब लिंकः http://www.youtube.com/watch?v=EZjCBH3KUfk

२. गीतः क्या करते थे साजना तुम हमसे दूर रहके

चित्रपट: लाल दुपट्टा मलमल का
लोकेशनः भंडारदरा (विल्सन डॅम)
यु ट्युब लिंकः http://www.youtube.com/watch?v=1prbCxM95Ow

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गीतः मन बसीया ओ कान्हा
चित्रपटः तेरे नाम
स्थळः कल्याण जवळील उल्हासनगर येथील बिर्ला मंदीर.

ओहो, तो 'सौ बार जनम लेंगे' वाला धबधबा कोणता हा मला कधीपासूनचा प्रश्न होता. Happy

पुढील गाण्यांचं चित्रिकरण कुठे झालं माहित आहे का?

१. ओ हंसनी (चित्रपट जहरीला इन्सान)
२. पुकारता चला हू मै (चित्रपट मेरे सनम)
३. चल कही दूर निकल जाये (चित्रपट दूसरा आदमी)

सरस्वतीचंद्र मधील "छोड दे सारी दुनिया किसी के लिए...." हे गाणं कुठे चित्रित झालंय?
व्हिडियो बघताना हा सारा परीसर मला बोरीवली नॅशनल पार्कमधील "कान्हेरी गुंफासारखा" वाटतोय. Happy

https://www.youtube.com/watch?v=rOhLtysVpaE

जिंदगी के सफर में गुजर जाते है
सुबह शाम..
वो फिर नही आतें
वो फिर नही आतें.. हे राजेश खन्नावर चित्रीत झालेलं आपकी कसम या चित्रपटातलं गाणं..

धावत्या ट्रेन मध्ये राजेश खन्ना बसलाय आणि खिडकीतून त्याला दिसताहेत पळणारी स्टेशनं..

मध्ये लागणारा बोगदा.. विठ्ठलवाडीचा बोगदा.. उल्हासनगर स्टेशन.. स्टेशनवरची गर्दी....

हे सगळं कल्याणच्या पुढच्या ट्रॅकवर चित्रीत झालंय.

आणि नंतर बरंच पुढे गेलं की एक नारळाचं झाड पळताना दिसतं आणि एक छानसं देऊळ अलगद नजरेसमोरुन पार होतं..

ते देऊळ बदलापूरच्या गावदेवीचं..! गाण्यात देऊळ आणि त्या नारळाच्या झाडाव्यतिरिक्त आजूबाजूला काही म्हणून दिसत नाही..

आणि आता.. नको इतका गजबजाट आहे तिथे.. त्यात ते देऊळ आणि परीसराची निरव शांतता कुठल्या कुठे लुप्त झालीये..!!

गीतकारः आनंद बक्षी

संगीतकारः आर. डी बर्मन..

http://www.youtube.com/watch?v=nyZ6mv5y5mE

मस्त.. आफताब शिवदासानीचा पहिला चित्रपट. त्यात उर्मिलाचे एक गाणे नामिबीया मधे चित्रीत झालेय. मस्त लोकेशन आहे.

अकेले है तो क्या गम है..
या गाण्यातली मुरमाड दगडाच्या टेकड्या शोलेचे शूटींग झाले त्या भागातल्या आहेत का ?

Pages