कब्जेदार म्हणजे काय ?

Submitted by हेलबॉय on 24 February, 2013 - 05:41

कब्जेदार म्हणजे काय ? नक्की कोण कब्जेदार होऊ शकतो ?मुळ मालक कब्जेदाराला कायदेशीररीत्या काढू शकतो का?
वैध आणि अवैध कब्जेदारात काय फरक आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागा/घराचे कब्जेदार म्हणजे त्याची कुलुप किल्ली कुणाच्या ताब्यात आहे? तो.
वैध म्हणजे घरमालक.
अवैध म्हणजे जबरदस्तीने तिथे घुसलेला. उदा. अतिक्रमण धारक. पण हा 'कब्जेदार' होण्यासाठी त्या जागेची म्युन्सिपाल्टी शेतसारा इ. भरत असला पाहिजे.
अधिक माहिती वकीलास विचारा.

कबजेदार म्हणजे ताबा असणारा. possession holder. मालकी म्हनजे टायटल. साधारण स्थितीत मालकी आणि ताबा एकाच व्यक्तीकडे असतो. तुम्ही भाड्याने फ्लॅटमध्ये रहात असाल तर मालकी (टायटल )माल्काचे आणि ताबा तुमचा असे असते. तुमची मोटरसायकल दुसर्‍याजवळ वापरात असेल तर पुन्हा मालकी आणि ताबा वेगळा. कबजा उर्फ ताबा दिवाणी मालमत्तेत महत्वाचा असतो. पण ताबा हा काही मालकीचा निर्णायक पुरावा नाही. ताबा अनधिकृत ही असू शकतो.अतिक्रमीतही असू शकतो.ताबा तुमच्याकडे कोणत्या कायदेशीर पद्धतीने आला हे सिद्ध करावे लागते.अन्यथा एविक्शनचा दावा जमिनीच्या आणि घराच्या बाबतीतही लावता येतो. अ‍ॅडवर्स पझेशन नावाचा एक प्रकार आहे. १५ वर्षे की कायसे जमीन अनअधिकृत रीत्या कबजात असेल तर ते अधिकृत होते.
थोडक्यात कबजेदार म्हनजे मालमत्ता प्रत्यक्शात ज्याच्या ताब्यात आहे तो. मग तो पझेशन विथ टायटल असू शकते, पझेशन विदाऊट टायटल (पण कायदेशीर),किंवा अनधिकाराने बळ्कवलेला ताबा असू शकतो....