सा.न.वि.वि: अगो

Submitted by संयोजक on 24 February, 2013 - 00:54

Mabhadi LogoPNG.png

मायबोली आयडी - अगो
पाल्याचे नाव - अरुष
वय - पाच वर्षे नऊ महिने

Arush Marathi Patra.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाब्बास! किती छान अक्षरात पत्र लिहिलयसं रे आजीला. असंच एक गोड पत्र मावशीलापण पाठवशील का? तुझ्या पत्राची वाट बघते Happy

धन्यवाद सगळ्यांना Happy
अरुषच्या शब्दांत XXX म्हणजे kiss kiss kiss. लाडात असला की दोन-तीन ओळी भरुन सुद्धा किसेस मिळतात Wink त्याच्यासाठी मध्ये एक मराठी मुळाक्षरांचा तक्ता प्रिंट करुन आणला. त्यानंतर त्यातली अक्षरं तो आपणहून बघून काढतो पण अशी सलग जोडाक्षरं असलेली वाक्यं लिहायला तसं बर्‍यापैकी कठीण गेलं. पेशन्सही खूप ठेवला त्याने. येऊन-जाऊन एकेक वाक्य लिहिलं. पण हे निमित्त मिळालं म्हणूनच लिहिलं गेलं त्यामुळे संयोजकांना मनापासून धन्यवाद.

'रशियन परीकथा'- लक्ष आहे ना अगो? >>> Lol माझ्या लहानपणी आईने आणलं होतं माझ्यासाठी ते सचित्र पुस्तक. खूप गोड गोष्टी आहेत. त्यातल्या दोन गोष्टी मी मध्ये अरुषला सांगितल्या, तेव्हापासून त्याला ते पुस्तक बघायची खूप उत्सुकता लागलीय Happy

शाब्बास अरूष! खूप छान लिहीलं आहेस. अगदी पैकी च्या पैकी मार्क. तुला आणि आईला पण. अरूष, मी फिनीक्सला तुझ्या आजीला भेटले बरं का! तुझ्या काही गमती जमती पण सांगितल्या आजीनी आम्हाला. तू भेटणार आहेस नं तिला लवकरच? वा, मजा आहे एका मुलाची!

छाने Happy

अर्रे, प्रशस्तीपत्र पाहिलंच नव्हतं. मस्त आहे एकदम. अरुष पण खूश झाला बघून Happy

नवीन प्रतिसादक आणि संयोजकांना धन्यवाद Happy

Pages