कुठे शोधिसी दांडेकर अन कुठे शोधिसी होळकर (विडंबन)

Submitted by किरण कुमार on 23 February, 2013 - 08:03

(मूळ गाण

गायक व शब्दरचना - श्री सुधीर फडके यांची माफी मागून)

कुठे शोधिसी दांडेकर पूल कुठे शोधिसी वेशी
कागदावरचा पत्ता राहतो अखेर कागदापाशी ..

पत्ता बघता गेला गडबडून तू न पाहिले नीट वाचून
दांडेकर म्हणता म्हणता होळवर वर तू बसला जाऊन
दिवसाकाठी येरझारा तूझा वाढला उगाच पारा
काय तूझा उपयोग वेड्या राहूनी सदाशिव पेठी.. ...

कुरिअरच्या त्या हातात थप्पा
मारतोस तू वायफळ गप्पा
कधी फिरतो स्टेशन भवती
तर कधी प्लॅटफॉर्मवरती
काय अभाग्या कामावरुनी चारदा जातो घरती

पत्ता कळतो गूगल मधून पत्ता कळतो जस्ट डाईलवर
कधी भेटतो माणूस भला पत्ता सांगून शिक्का फाईलवर
रविवार सोमवार सोडूनी वेड्या तू का जाशी बुधवारी

Group content visibility: 
Public - accessible to all site users