BMM 2013 च्या Banquet Dinnerचं खास आकर्षण: पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांचं गाणं!

Submitted by अजय on 21 February, 2013 - 11:24

padmaja_phenany.jpgपद्मजा फेणाणी-जोगळेकर यांची अनेक गाजलेली भाव-चित्रपटगीते, बंदिशींवर आधारित गाणी खुद्द त्यांच्याच आवाजात ऐकण्याची ही नामी संधी!! अधिवेशनाची आणि या Banquet Dinnerचीही नावनोंदणी सुरु आहे.
http://bmm2013.org/ipc-padmaja.html

या कार्यक्रमाची अधिक माहिती आणि मेनू इथे पाहता येईल.
http://bmm2013.org/banquetdinner.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोंधळ होणार नाही. हे ज्याला फॉर्मल सीट डाऊन डिनर म्हणतात अशा प्रकारचे असेल. तुमचे टेबल अगोदरच पूर्वनियोजीत असेल. अधिवेशनातल्या इतर जेवणापेक्षा याची व्यवस्था वेगळी असेल. तुमच्या जेवणाच्या टेबलावर तुम्हाला वाढले जाईल. आणि सगळे उपस्थित एकाच वेळेस जेवण सुरु करतील.

अशा प्रकारचे जेवण आणि असा कार्यक्रम (अधिवेशनाच्या पूर्व संध्याकाळी) या अगोदरच्या बहुतेक सगळ्या अधिवेशनातही होते आणि कुठलाही गोंधळ न होता ते पार पडले आहेत. सहसा जेवण संपत आले/संपले की कार्यक्रम सुरु होतो. आणि तुम्ही तुमच्याच जागेवर बसून त्याचा आनंद घेता.

या कार्यक्रमाचे तिकिट वेगळे आहे. आणि सभागृहाची क्षमता फक्त ८०० लोकांपर्यंत मर्यादित आहे.

नाही, गोंधळ म्हणून नाही, पण मला तरी व्यक्तिश: ते परफॉर्मरसाठी अपमानास्पद होत असेल असं वाटतं नेहमी. अर्थात त्यांनी आमंत्रण स्वीकारलं तेव्हा त्यांना त्याची कल्पना असणार. आणि असे कार्यक्रम होतात हेही खरं.
(मग मत कशाला दिलं? राहवलं नाही म्हणून. Happy )

सहसा जेवण संपत आले/संपले की असे कार्यक्रम सुरु होतात. आणि तुम्ही तुमच्याच जागेवर बसून त्याचा आनंद घेता

स्पष्ट मत मांडत असल्याबद्दल क्षमस्व पण मला ही संकल्पना अजिबात आवडली नाही / आवडत नाही. फक्त गाणंच नाही तर कुठलीच लाईव्ह कला सादर होताना लोकं खातायंत आणि त्यांचं लक्ष विचलीत झालेलं बघता बघता कलाकाराने सादरीकरण करावं हे अन्यायकारक, ( प्रेक्षक सुजाण नसतील तर ) अपमानास्पदही वाटतं.

सहसा जेवण संपत आले/संपले की असे कार्यक्रम सुरु होतात. आणि तुम्ही तुमच्याच जागेवर बसून त्याचा आनंद घेता >>> ओके, ही पोस्ट नंतर वाचली Happy

फॉर्मल आहे म्हणून काय झालं? पुर्‍या, पराठे, नान सुरीनं कापून, करीत बुडवून काट्यानं तोंडात ढकलायला मराठमोळ्या जनतेला काहीच कसं वाटत नाही?? Proud

तुडुंब जेवणानंतर ब्रह्मानंदी टाळी लागण्याच्या बेतात असलेल्या मंडळींसमोर जीव तोडून कला सादर करावी लागणं दुर्दैवी आहे.

ए इथे टीपी करू नका. गल्लेवाले झाले म्हणून काय झालं? किती लाद्या ठेवतील शिरावर? Proud

अजय Light 1 Happy
आता खरंच टीपी नको इथे. Happy

हे म्हणजे जेवणाचा स्वाद आणि गाण्याची दाद एकाच मापात ! Wink Light 1

(संदर्भ: " वरणाची उकळी आणि हास्याची उकळी एकाच मापात"--- इति पु. ल. )

मला मेनुच(मराठी अधिवेशनाला प.न्जाबी मेनु का असेल!!??) आवडला! कन्स्पेट मला आवडत नाही! कारण वरची सगळिच लागु पडयातत..
असो शुभेच्छा!

चित्र मराठी मेनूचं आणि मेन्यू वास्तवात पंजाबी आहे.
मराठी मेनूला अजून फॉर्मल सीट डाउन डिनर टेबलवर जाण्याइतकं ग्लॅमर नाही. Wink
चपली कबाबचा फोटो आणि रेसिपी अधिवेशन संपल्यावर टाका इथे.

जेवताना गाणं हि कल्पना चुकीची आहे असे मा. स्प. प्रा. म. आहे.
दोन्हीचा अपमान आहे.
(पंजाबी जेवण असल्याने स्टॅटस वाढते):फिदी: परत मराठी माणसं कशी मिळून मिसळून वागतात खातात ह्याचे लक्षण दिसते. आजकाल सगळ्याच ठिकाणी हि फॅशन आहे, मराठी कार्यक्रमात पंजाबी जेवण. गुजराती साडी नेसून येतो मग. Proud

सध्या इतकेच (मत) पुरे. Happy