(तस्वीर तरही) सागराला माग पाणी

Submitted by उमेश वैद्य on 21 February, 2013 - 07:13

(तस्वीर तरही) सागराला माग पाणी

सागराला माग पाणी, सावली वृक्षाकडे
त्याचसाठी घालती ते अंबराला साकडे

आड पाण्याचा भरूनी वाहतो केंव्हा इथे
व्हायचे की पोह-याने फक्त थोडे वाकडे

ठरवल्या होत्या दिशाही वेगळाल्या आपल्या
सोडती ना गुंतलेल्या या मनाची माकडे

तोकड्या सोई तरीही गिरवली मी अक्षरे
शिकवण्याला एक बाई अन बसाया बाकडे

गगन ताऱ्यांचा पसारा मोजणी कैसी जमे
मोजती शास्त्रज्ञ देती तारकांना आकडे

===========================

येत ना शोभा नभाला चंद्र हा गेला कुठे?
देव ही उडवून रात्री तारकांना पाखडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसरा मक्ता वा ! ....पहिल्या मक्त्यातला शास्त्रज्ञ देती आकडे मस्त

मतला छान पण् तेच अंबराला साकडे घालतील तर पाणी सागरास (खारट असते की ते) व सावली वृक्षाकडे का मागायची ?..........खयालातली सखोलता आवडली माण्ड्णी नाही

मनाची माकडे नाही आवडला भरकटलाय तो काफिया बदलून बघा काही होतेय का ते

शाळेचा शेर त्यातल्यात्यात वासरात लंगडी गाय Happy