पावलांपाशी 'जितू'ला जोजवा हो विठ्ठला !

Submitted by रसप on 21 February, 2013 - 04:21

आज काही आपलेही ऐकवा हो विठ्ठला
दु:ख विश्वाचे मलाही दर्शवा हो विठ्ठला

मी कवाडे उघडली माझ्या मनाची, आत या !
अन प्रियेची रिक्त गादी चालवा हो विठ्ठला

रोज माझे एव्हढेसे दु:ख मी गोंजारतो
अंश थोडा 'माउली'चा दाखवा हो विठ्ठला !

पंख फुटले ह्या मनाला भरकटे येथे-तिथे
अंबराच्या पिंजऱ्यातुन सोडवा हो विठ्ठला

आर्ततेने मागतो प्रत्येक जण काही तरी
मी कधी लाचार झालो ? आठवा हो विठ्ठला

वाटते की झोपलो नाही किती वर्षांत मी
पावलांपाशी 'जितू'ला जोजवा हो विठ्ठला !

....रसप....
२० जून २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/06/blog-post_21.html

प्रेरणा -

ऐक ना आता स्वतःला विठ्ठला
लाव ना माझा लळा तू लाव ना !!

- वैभव कुलकर्णी उपाख्य वैवकु/ वैभभू/ वैभ्या/ (वैभवा?)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुनीच आहे.... गुलमोहरात प्रकाशित केली होती. पण आज सकाळपासून माझीच मला सारखी स्मरत होती... म्हणून (उचंबळ अनावर होऊन) डकवलीच !

आज काही आपलेही ऐकवा हो विठ्ठला
दु:ख विश्वाचे मलाही दर्शवा हो विठ्ठला

व्वा.

मला ही अख्खी गझल आवडते पुन्हा प्रकाशित केल्याबद्दल धन्स रे जितू

मकस वर वाचली आजच मघाशी तिथले प्रतिसादही वाचले छान आहेत एक एक प्रतिसाद

पुनश्च धन्स

आर्ततेने मागतो प्रत्येक जण काही तरी
मी कधी लाचार झालो ? आठवा हो विठ्ठ
ला>>> हा व्यक्तीशः आता पाहता जास्तच जवळचा वाटला

एक्झॅक्ट्ली अपोसिट् आहे हा ................

ऐक ना आता स्वतःला विठ्ठला
लाव ना माझा लळा तू लाव ना
!!]>>>>

तुझा दृष्टीकोन छान आहे ..तुला माझ्या शेरातली आर्तता दिसली असेल बहुधा पण ती लाचारी तर नाही ना मला असे मला स्वतःस वाटते आहे आहे का या बाबत गांभीर्याने विचार करत आहे ..........खूप अभ्यास करावाच लागणार आहे मला माझ्याच विठ्ठलाच्या शेरांचा याची जाणीव होत आहे ...........

वाहवा ,
वैवकु ,
तुमच्या या गझलेसमोर नतमस्तक !

विठ्ठल माझ्या श्वासांमधली 'जगायचे' ही गोडी
विठ्ठल माझी 'मरायचे'ची जाणिव थोडी थोडी

वाह क्या बात है !

विठ्ठल माझा ऐलतीर अन पैलातीरही विठ्ठल
विठ्ठल माझा प्रवास 'मधला' विठ्ठल माझी होडी

व्व्व्वा ! ! !

विठ्ठल माझा नाही की विठ्ठल त्याचाही नाही
विठ्ठल अवघ्या मानवतेच्या बापाची गाठोडी

साष्टांग नमस्कार !

आणि लिंक देऊन ही गझल इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले आपले खूप खूप आभार !

भाव खूपच चांगल्या तर्‍हेने व्यक्त झालेत...... आवडली.

"पंख फुटले ह्या मनाला भरकटे येथे-तिथे
अंबराच्या पिंजऱ्यातुन सोडवा हो विठ्ठला" >>> हा सर्वात आवडला.