'मांडावकराचो बाबलो '

Submitted by अव्या खलिफा on 20 February, 2013 - 06:24

537163_423400864405037_1404691870_n.jpg

हो मांडावकराचो बाबलो,
पुर्णा वर्षभर मेहनत करतलो.....!
यंदा आंबे मॉप येतेलेत त्येच्या कलमाक म्हणान तसो ता जाम खुश हा...!
मागले वर्षाची आठवाण चांगलीच हा त्येका.........

चेडू इला होता माघारपणाक तेका देवक ह्येच्याकड डझानभर आंबेव नाय रवले.
पतपेढीतला कर्ज डोक्यावर होता, धरले-उरले आम्बे यष्टी डेपूच्या सामनी उन्हातान्हातून इकून काय पैसो गावलो तो सगळो कर्ज फेडण्यात गेलो
चेड्वाची जायची येळ आली तसा ह्याच्या डोळ्यात पाणी ईला....

अल्की समझुन गेली बापसाच्या डोळ्यातला पाणी कशान ईला ता...
जातेयेळी सांगून ग्येली
अण्णानू चल्लय मी...... माका आता काय देव नका, गाडयेतून जावचा आसा, सामान जास्त झाला तर चढुक मिळना नाय, आणि आमचीकड पण आंबे मॉप धरले आसत तेवा हयसून काय देव नका,
माडा-झाडावर चढू नका...आयेची काळजी घेवा .... मी इलय पुढले वर्षाक.....!

आवंढो गीळून सामान उचलून बाबलो पोरीसंगाती चलुक लागलो.....
आणि मनात ठाम केल्यान ह्ये वर्षी नाय जमला पण फुडल्या खेपेक पेटयी भरून आंबे देवचे..!!
आणि आता त्ये दिवसाची वाट बघतालो बाबलो...कारण पोरीसंगाती न्हानगो नातु पण येवचो हा.... Happy

(सदर छायचित्र नेट वरून साभार)

-अवि विचारे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवि.. खरच सांगितलस अगदि.. ज्यांच ह्याच धंद्यावर पोट असतं त्यांची हिच गोष्ट असते..
छान लिहिलस. Happy

स्फुट छान.
श्री अरुण शानभाग यांनी काढलेला फोटो वापरला असेल, तर त्यांची परवानगी घेतल्याचे नमूद करा.
मायबोलीकर अशा हक्कांबाबत संवेदनशील आहेत.

गोष्ट छोटी आहे पण कोकणातल्या माणसाच अंतर्मन ढवळुन काढणारी आहे. पोरांना नातवंडाना पोटभर आंबे खाउ घालयाचे सुख सामान्य कोकणी माणसाकडे नाही याचे वैषम्य वाटते.

<< गोष्ट छोटी आहे पण कोकणातल्या माणसाच अंतर्मन ढवळुन काढणारी आहे.>> सहमत.

मी सुद्धा सहमत

बाकी या लेखातील भाषा जगातील सर्वात गोड बोलीभाषा आहे याबाबतही कोणाचे दुमत नसावे. Happy