पेशवाईतील साडेतीन शहाणे

Submitted by पिल्या on 20 February, 2013 - 02:25

मला कोणी सांगु शकेल का, की पेशवाईतील साडेतीन शहाणे कोण होते?

माझ्या माहितीप्रमाणे
सखाराम बापु बोकील - १
विट्ठ्ल सुंदर - १
देवाजी पंत - १
नाना फडणवीस - अर्धा

कोणी ह्याच्यावर अधिक प्रकाश टाकु शकले तर चांगलेच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला माहीत असलेले साडेतीन शहाणे हेच आहेत.
नाना फडणवीस - अर्धा कारण ते तलवारबहद्दर नव्हते म्हनुन अर्धे मानले जायचे पण ते मुत्सद्दी होते.

बारभाईंचे कारस्थान(?) रचण्यामागे हेच साडेतीन शहाणे होते ना? मला नक्की संदर्भ आठवत नाहीयेत Sad

नाही माझ्या वाचनात तरी अस आल नाहीये की महादजी शिंदे या साडेतीन शहाण्यामधले येक होते म्हनुन. वर लिंबुनी सांगितलेल्या बारभाईच कारस्थान (?) हे या साडेतीन शहाण्याच. राघोबाला पेशवा पदापासुन दुर ठेवण्यासाठी नाना फडणवीसांनी नारायणरावांच्या पत्नी (पार्वतीबाई ?) यांना होणार्‍या आपत्याचा नावान पेशवाई चालवली. जर मुलगा झाला तर तो पेशवा होईल आणी जर मुलगी झाली तर दत्तक विधान करुन राघोबाला पेशवा होऊ द्यायच नाही अस होत ते. पण याला बारभाईच कारस्थान का म्हणतात हे आत्ता नक्की आठवत नाहीये. राघोबा मग ईंग्रजांना जाऊन मिळाला आणि त्यांच्यात ठरल्याप्रमाणे ईंग्रज राघोबाला पेशवेपद मिळऊन देणार आणी त्याबदल्यात वसई वगैरे भाग ईंग्रजांना मिळणार. पुढे महादजी शिंदेनी ईंग्रजांचा पराभव केला आणि राघोबाला अटक केली पण तो अटकेतुन पळाला. परत बहुतेक सुरतेच्या लढाईत पकडला गेला आणि मग कोपरगावला ३ लाख मानधनावर ठेवला गेला. दुसरा बाजीराव हा राघोबाचाच मुलगा ना?
महादजी शिंदे , यशवंतराव होळकर , गायकवाड , पिलाजी भोसले (नागपुरचे भोसले राज घराणे) हे समकालीन कर्तबगार मराठा सरदार होते.
नाना फडण्वीसान महादजी शिंदेच्या मदतीन मुंबई आणी कलकत्त्यातल्या ईंग्रजांचा पराभव केला. मराठा आणि ईंग्रजांचे १८०० च्या माघेपुढे साधारण्पणे ४०-४५ वर्ष बरेच युद्ध झाले.
हे सगळ वाचुन खुप काळ लोटलाय. काही चुक असेल तर जाणकार सांगतिलच.

राघोबाला पेशवा पदापासुन दुर ठेवण्यासाठी नाना फडणवीसांनी नारायणरावांच्या पत्नी (पार्वतीबाई ?) यांना होणार्‍या आपत्याचा नावान पेशवाई चालवली >> नारायणरावांच्या पत्नी गंगाबाई होत्या.. या नारायणरावांच्या खुनाच्या वेळी गरोदर होत्या... राघोबादादांना पेशवाईपासुन दूर ठेवण्यासाठी पेशवाईतल्या बारा सरदारांनी त्याना पुण्यातून पुरंदरगडावर हालवले.. बहुतेक तेथेच पुढचे पेशवे -- सवाई माधवराव यांचा जन्म झाला...

पार्वतीबाई ह्या सदाशिवरावभाऊ यांच्या पत्नी होत... सदाशिवरावभाऊ ( नानासाहेब पेशव्यांचे आणि राघोबादादा यांचे भाऊ ) पानिपताच्या लढाईमधे मारले गेले... पण त्यांचे शव सापडले नाही.. म्हणून ते परन येतील या आशेवर पार्वतीबाई सती गेल्या नाहित आणि त्यांनी विधवेचि वस्त्रेही नेसली नाहीत....

बहुतेक १) महादजी शिंदे २) सखारामबापू ३) हरिपंत फडके आणि १/२) नाना फडणीस असे आहेत... (स्वामी कादंबरीत ऊल्लेख आहे त्यांच्या नावांचा... पण मला हरिपंत फडके होते क दुसरे कुणी ते नीट आठवत नाहिये आता....
नाना फडणीस सोडून इतर तिघेही अतिशय मुत्सद्दी आणि तेवढेच तलवारबाजही होते... म्ह्णून त्यांना अर्धा शहाणा म्हणतात...
या साडेतीन शहाण्यांनीच मराठे , निजाम आणि नागपूरकर भोसले यांची एकजूट करून इंग्रजांना मात देण्याचा डाव आखला होता... ती एकजूट बहुतेक वडगावच्या लढाईत दिसली पण पुढे टिकली नाही....

>>१) महादजी शिंदे २) सखारामबापू ३) हरिपंत फडके आणि १/२) नाना फडणीस असे आहेत
महादजी शिंदे नसुन वेगळे कोणीतरी होते असे वाटते, पण आता आठवत नाहीये नक्की.

महादजी शिन्दे नक्कीच नाहीत. पण वडगावच्या लढाईत शिंद्यांनी ब्रिटिशांचा पराभव केला . भारतात ब्रिटीशांचा झालेला हा एकमेव पराभव आहे. 'इष्टुर फाकडा' हा ब्रिटिशांचा सेनानी होता Happy
दुसरी मराठे इंग्रज लढाई बरहानपुरला झाली आणि तिसरी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील असई गावात झाली. या दोन्ही लढायात मराठ्यांची आपसातच (विशेषतः शिन्दे व होळकर)जुम्पली त्यामुळे त्या जिंकण्यासाठी इंग्रजाना फारसे काही करावे लागले नाही.

रॉबीनहूड,

>> दुसरी मराठे इंग्रज लढाई बरहानपुरला झाली आणि तिसरी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील
>> असई गावात झाली. या दोन्ही लढायात मराठ्यांची आपसातच (विशेषतः शिन्दे व होळकर)जुम्पली
>> त्यामुळे त्या जिंकण्यासाठी इंग्रजाना फारसे काही करावे लागले नाही.

बुर्‍हाणपुराच्या लढाईचं माहीत नाही, पण असईची लढाई इंग्रजांना कठीण पडली होती. इंग्रज सेनापती आर्थर वेलस्ली होता. त्याने पुढे नेपोलियनला वॉटरलूच्या लढाईत हरवलं. वेलस्लीच्या म्हणण्याप्रमाणे असईची लढाई वॉटरलूपेक्षा भारी होती.

आ.न.,
-गा.पै.

हे लोक राघोबाच्या विरोधात का होते ते लक्षात नाही. पेशवाईतील काही वर्षे अनेक संघर्ष केवळ राघोबाला पेशवा होऊ द्यायचे नाही म्हणून चालू होते असे दिसते. त्याचे कारण काय?

(बाय द वे, यातील दोघांना वगळून तिसरा कोणीही कधीच फक्त नाना बरोबर जात नसेल. 'दीड शहाणे' म्हणायला नको म्हणून Happy )

फारएण्ड, मला वाटतं की राघोबाने नारायणरावाचा खून केला म्हणून त्याला पुढं येऊ दिलं नाही.
आ.न.,
-गा.पै.

हा विषय खरोखरच उत्सुकता निर्माण करणारा आहे. मराठीत माझ्यामते यावर लेखन झालेले आहे. ऐतिहासिक कादंबरीच्या स्वरुपात नसले तरी बखरीच्या रुपात असावे कारण मराठीतली तीन गाजलेली नाटके

स्वामी, रमामाधव आणि ? यात या व्यक्तींचे संदर्भ येतात.

काहीसा उशीरा हा धागा पाहिला/वाचला.....प्रतिसादही वाचले. या विषयाबाबत माझे बर्‍यापैकी वाचन [अभ्यास म्हणत नाही...] असल्याने संदर्भाकरीता खालील माहिती माझ्याकडून.

पेशवाई बहरात होती....नानासाहेब, थोरले बाजीराव आणि काही प्रमाणात थोरले माधवराव यांच्या काळात....त्यावेळी "कारभारी" मंडळ जरी अस्तित्वात होते तरीही एक सखारामपंत बोकील सोडले तर अन्य कारभार्‍यांना भलतेच महत्व नव्हते. पेठे फडके आदी मंडळी तर सैन्याच्या देखरेखीखाली, शिस्तीसाठी नियुक्त. अंतर्गत राज्यकारभाराची व्यवस्था, निजाम आणि इंग्रज संबंध, साम्राज्य वाढीपेक्षा महसुलावर जोर आदी बाबींसाठी निर्णय घेण्यास खुद्द वरील तीन पेशवे समर्थ असल्याने ते कारभारी मंडळाकडे 'घेतलेल्या निर्णयावर सल्ला' याच भूमिकेतून पाहात असत.

पण माधवरावांच्या अकाली मृत्यूमुळे हे चित्र पालटले कारण बोकीलांचा ओढा जरी राघोबादादांकडे असला तरी ते 'पेशवेपदा' वर येता कामा नयेत असा जो कारभार्‍यांनी [नारायणरावांच्या वधानंतर] पवित्रा घेतला त्याला बापूंनी विरोध केल्याचे दिसत नाही. गंगूबाई गरोदर होत्या आणि त्याना पुत्रच होईल या आशेवर मग बारभाईनी पेशवाईचा कारभार त्याच्याच नावाने चालू केला असे दप्तर सांगतेच.

"पेशवाईतील साडेतीन शहाणे'.... हा या धाग्याचा मुख्य हेतू असल्याने त्यांच्याविषयी सांगताना १. सखारामपंत बोकील, २. विठ्ठल सुंदर, ३. देवाजीपंत चोरघडे [यांच्या नावाचा उल्लेख काही ठिकाणी जिवाजीपंत असाही होतो]. या तीन व्यक्ती वयाने अनुभवाने मुत्सद्दीपणाने आणि पराक्रमानेही ज्येष्ठ असल्याने यांच्याविषयी लिहिताना/बोलताना 'पूर्णत्वा'ने उल्लेख होतो, म्हणजेच 'शहाणा' या अभिनामाला हे तिघे पुरेपूर उतरत होते.

अर्धा शहाणा म्हणजे जरी आपण नाना फडणीस [फडणविस] यांच्याकडे अंगुलीनिर्देश करीत असलो तरी ते 'अर्धवट' होते असे कुणी समजत नसत. मुळात वरील तिघांच्या तुलनेत ते कारभाराबाबत खूपच कनिष्ठ होते इतकेच नव्हे तर बोकील आणि देवाजीपंत यांच्यापेक्षा ते तब्बल तेवीस वर्षांनी लहान होते.

"पेशवाईतील साडेतीन शहाणे' याचा अर्थ 'पेशव्यांचे साडेतीन शहाणे' असा अर्थ घेण्यात येऊ नये. 'पेशवाई' आणि आजुबाजूची साम्राज्ये अशी एकगठ्ठा विद्वत्ता केल्यानंतर सार्‍या महाराष्ट्रातील साडेतीन शहाणे....पैकी दीड शहाणे पेशवाईत तर एक निजामाकडे तर दुसरा नागपूरकर भोसले यांच्या पदरी होते असा अर्थ घेतला जावा.

वर एका प्रतिसादात 'बारभाई' बद्दलही विचारपूस झालेली दिसत्ये. त्या संदर्भात दोन ओळी.

"बारभाई" म्हणजे Regency Council. असे कौन्सिल युरोपिअन राज्यकाळातही होते. तो एक राज्यकारभाराचा अविभाज्य घटक मानला जातो. नारायणरावाच्या वधानंतर त्या दुर्दैवी घटनेस जबाबदार असलेल्या रघुनाथरावांना पेशवाई मिळता कामा नये या उद्देश्याने माधवरावांच्या हाताखाली कार्य केलेल्या निष्ठावानांनी त्यासाठी ज्या काही योजना आखल्या, अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न केले त्यामध्ये जे मुत्सद्दी, कारभारी तसेच सरदार सामील होते त्यांची संख्या बारा होती [असे मानले जाते]. त्यानी मांडलेल्या योजजेलाच 'कारस्थान' हे नाम त्या काळातील दप्तरी भाषेत नाम मिळाले. कारस्थान म्हणजे काही कपट वा धोका नव्हे तर कारभाराची योजना असाच त्याचा अर्थ घ्यावा लागतो.

बारभाई असे होते :
१. नाना फडणीस [नेतृत्व यांच्याकडेच होते], २. हरिपंत फडके, ३. मोरोबा फडणीस, ४. महादजी शिंदे, ५. तुकोजीराव होळकर, ६. सखारामबापू बोकील, ७. त्रिंबकराव पेठे, ८. भगवानराव प्रतिनिधी, ९. मालोजी घोरपडे, १०. रास्ते, ११. फलटणकर आणि १२. बाबुजी नाईक.

अर्थात या बारभाईंचा कारभार म्हणजे केवळ राघोबादादाच्या महत्वाकांक्षेला थोपविणे इतकाच नव्हता [बारभाईतदेखील तशी सुंदोपसुंदी होतीच म्हणा, म्हणजे बोकील, मोरोबा आणि तुकोजीराव याना राघोबांबद्दल आदर होताच, त्यामुळे बाकीच्यांना दादांच्यावर थेट कार्यवाही करणे जड जात असे.... शेवटीशेवटी तर नानांनी बापूना कैदेत डांबले होते...] तर आपल्या पराक्रमाने त्यानी त्याही स्थितीत दिल्लीपासून म्हैसूरपर्यंत पेशवाईचा दबदबा कायम ठेवला होता.

असो.
अशोक पाटील

अशोकदा फार व्यवस्थित माहिती दिलीत.

देवाजीपंत चोरघडे [यांच्या नावाचा उल्लेख काही ठिकाणी जिवाजीपंत असाही होतो]. >>>
+१

बारभाईंचे कारस्थान म्हणजे बारा लोकांचे का? कोण हे बारा लोक?
की हे नाव कारस्थानाचे आहे? असे नाव का?
हे एकच कारस्थान होते, की अशी बरीच कारस्थाने त्यांनी केली?

राघोबाच्या विरोधात का होते ते लक्षात नाही. पेशवाईतील काही वर्षे अनेक संघर्ष केवळ राघोबाला पेशवा होऊ द्यायचे नाही म्हणून चालू होते असे दिसते. त्याचे कारण काय? >>> माझ्या मते काही कारणे ही असावीत----
१. राघोबाचे व्यक्तीमत्व-- समशेरबहाद्दरी व्यतीरिक्त त्याच्यात राज्यकर्त्याला लागणारे अन्य गुण नव्हते. तो बाहेरख्याली होता(त्याच्या नाटकशाळा वगैरे..), हलक्या कानाचा होता,
२. त्याला स्वतःचे अपत्य, विषेशतः मुलगा, नव्हते.
३. त्याची बायको महत्वाकांक्षी होती आणि तो बाईलबुध्द्या होता. म्हणजे तो पेशवा झाला असता तर त्याच्या नावाखाली तिनेच राज्यकारभार चालवला असता.

ashok patilani dileli mahiti avadali .....parantu tya barbhainchi sthapana kartana hech bara jan ka nivadale yacha upapoh .......>>jase ki ashok patalani sangitalech ki he barbhainche pramukh nana fadnis hote tyavarun aplya lakshat yeil ki he nana 1/2 nasun purna (did) shahane hote ..tyana kuni virodh karu naye mhanun tyani he barabhai mandal sthapan kele

श्री. अशोक पाटील,
धन्यवाद.

पेशवेपदी जरी ४० दिवसाच्या सवाई माधवरावांना नेमले असले तरी राज्यकारभार या मंडळींनीच चालवून पेशवाई जिवंत ठेवली.

दुर्दैवाने या लोकांनंतर कुणि अनुभवी, कर्तृत्ववान माणूस पेशवेपदी आला नाही. म्हणून अंदाधुंदी माजली नि वाट्टोळे झाले.