शिवजयंती निमीत्त पुन्हा एकदा

Submitted by अनिल तापकीर on 18 February, 2013 - 22:32

अनिल तापकीर | 10 March, 2012 - 00:54

त्रासली गांजली जनता, नाही कोणी वाली |
तारावा हिंदुधर्म, साकडे देवास घाली |
दाही दिशा माजले दैत्य,गिळती महाराष्ट्रासी |
झाली मंदिरे जमीनदोस्त,भग्न केले देवांसी |
लेकी सुनांच्या अब्रूला,नाही राहिले रक्षण |
वतनदारांना तर प्रिय आपलेच वतन |
संत महात्म्यांनी केला देवाचा धावा |
या धरतीला ताराया अवतार घ्यावा |
संतांची गरीब रयतेची, देवास आली दया |
म्हणूनच देवांनी पाठविला शिवराया |
शिवरायांनी ऐसे अघटीत केले |
शून्यातून स्वराज्य उभे राहिले |
अफझलचा कोथळा बाहेर काढीला |
औरंग्याचा तर माजच जिरवला |
आदिलशहा निजामासी जागीच रोखले |
इंग्रजांसी मुंबईच्या वखारीतच कोंडले |
संतांचे देवालयांचे केले रक्षण |
खळ, नि दुर्जांनांचे करुनी निर्दालन |
त्रेतायुगी होते जसे रामाचे रामराज्य |
कलियुगी आमच्या शिवरायांचे शिवराज्य |
जय शिवराय

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users