========"मी "=========

Submitted by पुरुषोत्तमवरादे on 18 February, 2013 - 13:30

========"मी "=========

_________________________
चालण्या काट्यातुनी उठलो पुन्हा मी ...!!
एवढेसे दुःख अन खचलो पुन्हा मी ...!!

पेटत्या ठेवा दिशा अंधारलेल्या ....!
मार्ग माझे चालण्या हरलो पुन्हा मी ...!!

तू दिली ओठात गाणी गावयाला ...!
या तुझ्या कंठात गे बसलो पुन्हा मी....!!

तू पुन्हा धागे विनाया घे नव्याने ....!
या तुझ्या गोफातुनी तुटलो पुन्हा मी ...!!

काय आहे सांग ताजी खबर इथली ...!
बातम्या ऐकायला रुसलो पुन्हा मी ...!!

बोलका संसार त्यांचा चाललेला ...!
नित्य या शब्दातुनी कुढलो पुन्हा मी ..!!

तापतो आता नि विझतो कैक वेळा... !
तप्त सूर्यासारखा बनलो पुन्हा मी ....!!

आसमंत तुझा नि सारे चंद्र तारे ...!
व्याप ते सांभाळण्या सुटलो पुन्हा मी ...!!

तू नकोना पार जाऊ पायरीच्या !
आख सीमारेघ मज म्हटलो पुन्हा मी !!

बांधल्या डोळ्यास पट्ट्या कायद्याने !
या तुझ्या न्यायात गे लुटलो पुन्हा मी ......!!
___________________________
==========वराडे पु ग ======

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतला मलाही आवडला

रुसलो >>> इथे बसलो का नाही वापरलेत कित्ती सहज , थेट झाला असता शेर

गे शब्द भरीचा अनावश्यक

तू पुन्हा धागे विनाया घे नव्याने ....!
या तुझ्या गोफातुनी तुटलो पुन्हा मी ...!!>>>हा सर्वाधिक आवडला त्यातही विणाया असे हवे बहुधा

रदीफ छान आहे काफिये जस्रा मार खाताय्त पण अनेक मिसरे मस्त फ्लो सहीत आलेत छान वाटले वाचून

वरील तज्ञांशी सहमत
पुलेशु

टीपः प्राध्यापक साहेबांचा इतका लहान प्रतिसाद पाहिला नव्हता तुमच्यामुळे पहायला मिळाला धन्यवाद Happy

चालण्या काट्यातुनी उठलो पुन्हा मी ...!!
एवढेसे दुःख अन खचलो पुन्हा मी ...!!

क्या बात है !

वैवकु यांच्याशी सहमत .