चेहरे नविन

Submitted by योगितापाटील on 18 February, 2013 - 06:35

चेहरे
भावनांचा रंग खोटा फासलेले चेहरे
यंत्र हे आयुष्य आणिक..छापलेले चेहरे

कोणता प्याला विषाचा ना कळे हृदया वसे
डंख ते लपवून सारे भेटलेले चेहरे

सर्व ते अधिकार देवा घेतले यांनी तुझे
तू दिलेल्या चेहर्याला गाडलेले चेहरे

जीवनी आनंद घेण्या धाडले ना तू इथे?
त्याच जगण्याच्या व्यथांनी घेरलेले चेहरे

रंगमंची रंगला हा खेळ पात्रांचा असा
अभिनयाचे घेत बुरखे झाकलेल चेहरे

झापडे पावित्र्यतेची ओढलेली नेहमी
स्पर्श डोळ्या वासनांचा बाटलेले चेहरे

-योगिता पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल लिहायला नुकतीच सुरूवात केली असावी असं वाटलं वाचून...
वृत्त हाताळणी जमली आहे.. "झाकलेल" टायपो दुरूस्त करावा.

भरपूर शुभेच्छा! Happy

झाकलेले असे हवे ....टायपो !
गाडलेले शेर काफिया चपखल वाटत नाहीये अजून विचार करून काही चपखल काफिया सुचतोय का पहावे ...आग्रह विनंती सुचवणी असे काहीच नाही गै न
मक्ता फारसा जमला नाही असे वाटते शेराच्या लांबीपेक्षा मॅटर जरा जास्त वाटला खास् करूण दुसरी ओळ.... हेही वै म!! पुन्हा आग्रह विनंती सुचवणी असे काहीच नाही गै न )
पहिले दोन शेर फार आवडले ५ वा ही आवडला बाकीचेही आवडलेच पण जरा कमी Happy

सर्व ते अधिकार देवा घेतले यांनी तुझे
तू दिलेल्या चेहर्याला गाडलेले चेहरे

खुप आवडला बाकी शेर आवडले

vaibhav gairsamaj ajibat nahi ya chuka kalnyasathich mi gazal mayboli var takte aahe ,kahi sher aawadun ghetalya baddal dhanyawad

छान!

भावनांचा रंग खोटा फासलेले चेहरे
यंत्र हे आयुष्य आणिक..छापलेले चेहरे

मला तर मत्लाच आवडला! ग्रेट!

लिहीत रहा! छान लिहितेस. Happy