स्वप्ना

Submitted by आपटे सुरेखा on 17 February, 2013 - 08:52

सपना होऊन स्वप्नी आली
मोरपिसारा फुलारलेली
शुभ्रकळयांची गंधमोगरी
साखरचुंबन देऊन गेली
टिपूर चांदणी रात बिलोरी
लपेटलेली निळी दुलारी
गळामिठी ती घालून बसली
पहाटवाटा शिंपून गेली
सप्तसूरांचा नाद अनाहत
क्षितिज अंगण व्यापून उरली
इंद्रधनुषी रंग प्रीतीचे
अमृतरस ती पिऊन गेली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users