तहानलेली युगायुगांची.......(तस्वीर तरही)

Submitted by सुप्रिया जाधव. on 17 February, 2013 - 02:37

बरस नभा रे गड्गड नुसती नको फुकाची
तुझ्याचसाठी तहानलेली युगायुगांची

किती ढकलल्या कभिन्न डोहात मोज नाही
तशी कुणाला व्यथा उमजते खरी तळाची

तुला हवा तो निवड सख्या तू खुशाल रस्ता
हरेक रस्ता चढेल रे पायरी घराची

लहान आम्ही म्हणून येतो इथे शिकाया
उद्या नव्याने शिकूत शाळा खुल्या जगाची

कुठे हरवला असेल तारा हवा हवासा
कसून केली तपासणी या नभांगणाची

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती वादळे घरी नेणार्‍या आपणच का? असा प्रश्न पडला आहे. दोन्ही आयडी सेम आहेत त्यामुळे एकदा वाटते की दोन्ही गझला लिहिणारी एकच व्यक्ती असेल. एकदा वाटते की नाही २९ डिसेंबर ते १७ फेब्रुवारी इतक्या छोट्या कालावधीत दर्जामध्ये एवढा मोठा फरक कसा काय पडू शकतो? दोन वेगवेगळ्या व्यक्ती असाव्यात.

आणि, "शकूत" म्हणजे ???

असो.. शेवटचा शेर - खयाल आणि सादरीकरण दोन्ही सुंदर.

कुठे हरवला असेल तारा हवा हवासा
कसून केली तपासणी या नभांगणाची<<<

शेर फार आवडला. बाकी गझल ठीकठाक वाटली. शिकूत - हे मलाही पटले नाही.

तस्वीर तरहीतील सहभागासाठी धन्यवाद व अभिनंदन Happy

"तुला हवा तो निवड सख्या तू खुशाल रस्ता
हरेक रस्ता चढेल रे पायरी घराची

कुठे हरवला असेल तारा हवा हवासा
कसून केली तपासणी या नभांगणाची" >>> हे दोन अधिक आवडले.
------------------------------------------------------------------------------------------------------------
मतला आणि दुसरा शेर, स्वतंत्र शेर म्हणून छान आहेत.
परंतु, दिलेल्या चित्राशी कितपत सुसंगत आहेत याबद्दल मी साशंक आहे.
वैम. कृगैन.

'शिकूत' मुळे रसभंगाला वाव मिळाला असे वाटते.

वर्षू, हर्षल, गजलुमिंया धन्यवाद!

बेफिजी, शाम, उकाका विशेष आभार Happy

उकाका,

या तस्वीर तरहीत खयालांच स्वातंत्र्य देण्यात आलेल होत आणी तसही मतल्यात गच्च भरुन आलेल्या आभाळाचा उल्लेख आलाय.

सविस्तर अभिप्रायाबद्दल मनःपुर्वक आभार Happy

-सुप्रिया.

गझल ठीकठाक वाटली. >>+१

हे दोन अधिक आवडले.>>> उकाकांशी सहमत

मतल्यात गच्च भरुन आलेल्या आभाळाचा उल्लेख आलाय.>>>> यसाठी अभिनंदन बाकी कुणीही हे आभाळ तरही शेरातून दाखवलेले नाही आपण दाखवलेत हे शेर वाचतानाच लक्षात आले होते

शिकूत>>>> समर्थन !!!
सोलापुरी टच आहे या शब्दाला मीही माझ्या येत्या गझलेत असाच एक शब्द वापरलाय
लोकांचा रसभंग होत असेलही हे मान्य ,पण याच चुकीचे/ गैर काहीच नाही अशाप्रकारे वापर त्यांच्या परिसरातील भाषेत होत नसला की लोकाना लवकर जुळवून घेता येत नाही त्यामुळे रसभंग जाणवत असेल कदाचित पण या शिकूत मध्ये वावगे ,चुकीचे अजिबातच काही नाही (तसे वाटावे हा प्रमाणभाषा या मुद्द्याचा प्रभाव असावा!!)
असो
पण बरका सुप्रियातै ही गझल मला फारशी न आवडण्याची नेमकी कारणे मलाही जरी जाणवली नाहीत तरीपण 'आम्हाला नाही बुवा आवडली!!'.. यात वाईट वाटून घ्यावे असे काहीच कारण नाहीही... तुम्हालाही अन् मलाही Happy

वैवकु प्रत्येकाचे मतप्रदर्शनाचे स्वातंत्र्य अबाधीत ठेवून योग्य सुचवणींचा विचार केल्यास तस आपल काही नुकसान होत नाही हे मी माबोवर आल्यावर शिकले Happy

तुमच्याही सविस्तर प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक आभार.

=सुप्रियातै Happy

ठिके, तुम्ही पण सोलापूरच्या असाल तर `शिकूत'वरील आक्षेप मागे, सोलापूरच्या नसाल तर मग मात्र आक्षेप कंटिन्यू
( कृहघ्या)

सुप्रिया
अनेक शेर आवडले...

शाळा आणि शेवटचा खूप अधिक प्रमाणात आवडले.
शिकूत खटकला नाही.. उलट सह्ज वाटला.. एखादं शाळकरी पोर आवेशात मास्तरांना सांगतंय असं वाटलं.
इतरवेळी भाषेचा लहेजा सांभाळतोच आपण.. पण एखादा असा शेरही कानाला गोड वाटतो.. तसाच होता हा Happy

>>सुप्रिया
अनेक शेर आवडले..<<

अहो, एकूण पाचच शेर लिहिलेत त्यांनी ( व्याकरणदृष्ट्या एकापेक्षा जास्त ते अनेक हे मात्र बरोबर आहे )

सुप्रियाजी अगदी खरं सांगू का ? तुम्ही ते उध्द्वस्त होण्या वादळे लिहिलय ना त्याला गझल म्हणतात. त्याच्या इतके/त्याच्या जवळपास जाणारे/त्याच्याहून सुंदर असे लिहीत रहा.

गजलुमियां नाही सुचवलत तरी राग येणार नाही Happy

कारण फेक आयडींच्या मतांना अवाजवी महत्व देण्याइतपत मी कमकूवत नक्कीच नाही.

ख-या नावाने काही सुचवण्याच धैर्य एकवटाल तर स्वागतच राहील .

धन्यवाद!

-सुप्रिया.

छ्या हो...याला रागावणं थोडच म्हणतात?
आणि सांगितल न फेक आयडींवर काय राग अन काय लोभ?

कवचकुंडल त्यागून बाहेर आलात तर युध्द ! गनिमीकाव्यातला कावेबाजपणा किती दिवस टिकणार ?

असो !

shikut chalu shakel pan shakyato talava..
`gharachi' ani `taLachi' he don sher yevdhe nahi avadle. baki 3 chan ahet
shevtcha sher chanach jamlay

>>कवचकुंडल त्यागून बाहेर आलात तर युध्द !<<

छे हो, युध्दासाठी का येतो आंतरजालावर मी. काही प्रतिसाद खरे मानून तुम्ही यालासुध्दा गझल समजू नये इतकीच माफक इच्छा

असो - शुभेच्छा

गजलुमिंया आपल्या प्रामाणिक सल्ल्याबद्दल खरोखर आभार!

इतकी समिक्षा करताय प्रत्येक गझलची तर तुमचीही एखादी वाचायला आवडेल गझल. काय आहे न एका आदर्श गझलेचे निकष ठरवता येतील त्यावरुन आम्हा सारख्या नवशिक्यांना.

इर्शाद ! Happy

-सुप्रिया.