निष्पर्ण तरूंची पदोपदी दिसते मांदियाळी (तस्वीर तरही)

Submitted by सुशांत खुरसाले on 16 February, 2013 - 04:41

निष्पर्ण तरूंची पदोपदी दिसते मांदियाळी
पण तरी आमच्या जगी सजते का दिवाळी ?

कोरडे आड ,काठ ओलवती लोचनांचे
शोधण्याला स्वतःस जल हिंडते रानमाळी.*

मान्य केली दिशा तुझी,पचवले हे दुरावे
भोगले एवढे तरी उरते का कपाळी...?

काय पुजायचे तेथे,कसले ञान आता
मास्तरांची जिथे रोज होते रे टवाळी..

चढत येती खयाल या मनाच्या पायर्यांना
तारकांचे गगन जणू गमते दाट जाळी..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

* डोळ्यात पाणी घेऊन रानोमाळ पाणी शोधत हिंडावे लागले ..डोळ्यातले पाणी जणू पाणी शोधत हिंडत आहे..