विभक्त

Submitted by प्रसाद पासे on 14 February, 2013 - 09:16

आताशा मीही झालो आहे निर्वातासारखा रिक्त
ज्याक्षणी झालीस तू माझ्यापासून विभक्त

मांडलीस तू तुझीच बाजू फक्त
माझं मन अजूनही आहे तसंच अव्यक्त
का इतकं होतं आपलं प्रेम अशक्त?
आताशा मी झालो आहे निर्वातासारखा रिक्त

नाही म्हणून गेलीस तू खूप दूर
इतकी अलगद लावून गेलीस मनाला हुरहूर
अगदी सहजच झालीस तू सर्व बंधनातून मुक्त
आताशा मी झालो आहे निर्वातासारखा रिक्त

म्हणालीस तू मला, झाली आहेस तू आतुन दगड
कधीच जाणली नाहीस का माझ्या भावनांची मुकी ओरड?
का आहेस तू तुझ्या भावनांशी एवढी आसक्त?
आताशा मी झालो आहे निर्वातासारखा रिक्त

झाल्या असतील चुका पण त्याची हि कुठली सजा
सगळंच सोडून, घेतलीस तू कायमची रजा
का झालीस तू सगळ्यांपासून विरक्त?
आताशा मी झालो आहे निर्वातासारखा रिक्त

सावरतोय स्वतःला मोजत स्वतःच्या चुका
घालवतोय आयुष्य मांडून स्वतःच्याच व्यथा
अन करतोय स्वतःला दिवसेंदिवस सक्त
ज्याक्षणी झालीस तू माझ्यापासून विभक्त
आताशा मीही झालो आहे निर्वातासारखा रिक्त

प्रसाद पासे

Group content visibility: 
Public - accessible to all site users