लाट नाही येत आता (तस्वीर तरही)

Submitted by -शाम on 14 February, 2013 - 07:05

मी जरी आसावलेला वाळल्या झाडापरी
लाट नाही येत आता एकही काठावरी

आड आणी पोहर्‍यागत मैत्र अपुले भासते
मी तळाशी एकटा, तू दूर..वर कोठेतरी

आसवांनी मात केली निर्णयावर शेवटी
घेतल्या होत्या खुशीने वाटुनी वाटा जरी

तो जुना सन्मान नाही शिक्षकाला आज पण
'शाम' करतो आवडीने पाखरांची चाकरी

ओळखावा मी कसा रे नेमका तारा तुझा
तू कुठे आहेस नक्की सांग 'बाबा' अंबरी

...............................................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो जुना सन्मान नाही शिक्षकाला आज पण
'शाम' करतो आवडीने पाखरांची चाकरी

ओळखावा मी कसा रे नेमका तारा तुझा
तू कुठे आहेस नक्की सांग 'बाबा' अंबरी.............अप्रतिम.....

क्या ब्बात है!!!

सगळेच शेर काबिले तारीफ!

आड आणी पोहर्‍यागत मैत्र अपुले भासते
मी तळाशी एकटा, तू दूर..वर कोठेतरी

हा अफलातूनच ...

धन्यवाद !

आहाहा मस्तच
अख्खी गझल छान सर्वांगसुंदर आहे
बाबा आणि पाखरांची चाकरी फार छान आहेत मतलाही लाजवाब ! तरीही कोणतेतरी एकदोन शेरच आवडले असे म्हणवत नाहीये
...........सगळेच शेर सर्वाधिक आवडले !!!

तो जुना सन्मान नाही शिक्षकाला आज पण
'शाम' करतो आवडीने पाखरांची चाकरी

ओळखावा मी कसा रे नेमका तारा तुझा
तू कुठे आहेस नक्की सांग 'बाबा' अंबरी

खासच!

तो जुना सन्मान नाही शिक्षकाला आज पण
'शाम' करतो आवडीने पाखरांची चाकरी

हा शेर पटला एका शिक्षकाच्या भूमिकेतून.

तो जुना सन्मान नाही शिक्षकाला आज पण
'शाम' करतो आवडीने पाखरांची चाकरी

ओळखावा मी कसा रे नेमका तारा तुझा
तू कुठे आहेस नक्की सांग 'बाबा' अंबरी<<<

मस्त शेर

धन्यवाद व तस्वीर तरहीतील सहभागासाठीही धन्यवाद Happy

Vva
Aad aani shevatcha sher bharich !!
Matlahi afat aavadla.