नसे राऊळी वा नसे मंदिरी

Submitted by जागोमोहनप्यारे on 15 October, 2008 - 05:23

माझी ही गजल स्पर्धेसाठी मी उशीरा पोस्ट केली... ती बहुतेक स्पर्धेला कन्सिडर होणार नाही... म्हणून इथे पोस्ट करत आहे....

नसे राऊळी वा नसे मंदिरी
तो 'मालकंस' आज भक्तात नाही.

तिचे विरहणे काय विशेष आता
तो 'मारवा' आज विरहात नाही.

नभी लोपले चांदणे शुभ्र कोठे
तो 'जोगिया' आज चंद्रात नाही.

प्रदूषणे झाकला सूर्य आता
तो 'पूरिया' आज अस्तात नाही.

उरे आज गोंगाट गीतात केवळ
ती 'भैरवी' आज सुरात नाही.

गुलमोहर: 

जामोप्या, अरे छान आहे गजल. पण इथे पोस्ट करण्याआधी कन्फर्म करुन घ्यायचे ना, कार्यशाळा ही गझल कन्सिडर करणार आहे की नाही ते !