बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १६ व्या अधिवेशनात मायबोलीचं गटग

Submitted by अजय on 13 February, 2013 - 13:55
ठिकाण/पत्ता: 
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १६ वे अधिवेशन र्‍होड आयलंड कंव्हेंशन सेंटर ( RICC) प्रॉव्हीडन्स, र्‍होड आयलंड

फिलाडेल्फीया, शिकागो अधिवेशनातल्या धमाल गटग नंतर, या वर्षीच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनातही मायबोलीचं गटग करणार आहोत. पहिल्या दिवशी जेवणाच्या वेळेस आपण एकत्र भेटू शकू.
गटगच्या प्रथेप्रमाणे, आता मेनूची चर्चा सुरु व्हायला हरकत नाही.

अस्सल मराठी जेवणासाठी : कोल्हापुरी मिसळीपासून नागपुरी वडाभातापर्यंत.
खमंग खाण्यासाठी : कांदापोह्यांपासून कचोरीपर्यंत.
तृप्त होण्यासाठी : मोदकापासून मठ्ठ्यापर्यंत

अशी सगळी तयारी होते आहे. तीनही दिवसांचे मेनु उपलब्ध आहेत.

Menu1 , Menu 2, Menu 3

http://bmm2013.org/

माहितीचा स्रोत: 
http://bmm2013.org/
तारीख/वेळ: 
शुक्रवार, July 5, 2013 - 18:30 to 19:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परदेसाई, नावनोंदणी करा. वर आणि BMM च्या वेबसाईटवरही (नसेल केली अजून तर)

स्वाती, बघा जमतंय का ! बाळ छोटं आहे म्हणून जमणार नाही का?

सिंडरेला, एक दिवसाचं तिकिट पण असतं. तिथे काउंटर ठेवतात. जाऊन घ्यायचं. बोस्टनवाले ठेवताहेत का कदाचित अजयला माहित असेल. किंवा त्यांच्या साइट्वर चेक कर.

सध्या एक दिवसाचे तिकिट उपलब्ध नाहिये. ऐन वेळी ठेवले जाईल कि नाहि हे तेंव्हाच्या बुकिंग वर अवलंबुन असेल. मला अधिक काहि कळले तर मीही इथे लिहीन.

मीपन येनार आहे अधिवेशनाला.तुम्ही पन करा नावनोन्दनी.

पहील्या दिवशी जेवणाच्या वेळी भेटायला मिळणार नाही मला. आम्हाला ११ ला जेवणकरुन तयारीला जाव लागेल. इतर वेळी भेट होईलच. Happy

आम्हाला ११ ला जेवणकरुन तयारीला जाव लागेल. >> कसल्या तयारीला जाताय भाई ? बारा पर्यंत तर opening ceremony आहे.

हो पण लगेच १ ला आमचा प्रोग्राम सुरु होतोय ना. मग स्टेज लावयचाय. माईक टेस्टींग, कॉस्चुम वगैरे.. एकंदर लहान मोठी धरुन ४०/४५ लोकं आहेत.

Pages