आज एक जागतिक सण साजरा केला जातो. भारतातल्या लोकांनी या सणाचा वसा उशीरा का होईना मनोभावे घेतला आहे आणि तो दरवर्षी यथाशक्ती पार पाडत आहेत. या सणाचा देव, संत वॅलेंतिन याच्या आराधनेकरता खालील आरती तयार केली आहे. भक्तांनी / इच्छुकांनी या आरतीचा आनंद घ्यावा ही विनंती. आरतीतल्या चुका माझ्या, मात्र आरतीचा कर्ताकरविता तो संत वॅलेंतिन आहे याची मला नम्र जाणीव आहे.
जय देव, जय देव, वॅलेंतिनी संता, हो प्रेमाच्या संता
कृपा जगावरी आदि पासूनी अंता, जय देव जय देव ||
येता फेब्रुवारी १४ तारीख, जरी महिना बारीक
भेटवस्तूंचा हा वाहे महापूर
खास व्यक्तींकरता याद्याही होत अन खरेद्या होत
प्रेमीजनांनी भरले बाजार
जय देव जय देव ....||
लाल रंगावरी विशेष लोभ, हा कसला लोभ
लाल गुलाब अन लालच ड्रेस
लाल्या अन लालीचे ठरती बेत, डिटेलमध्ये नीट
सिनेमा, खाणे अन वरळी सी फेस
जय देव जय देव ....||
दैत्य काही जरी नाके मुरडिती, भक्तां हिणविती
तुमच्या कृपेने परि भक्त तरिती
तुमची आराधना देई अपार शक्ती, सुचवी युक्ती
प्रेमाचे प्रवासी ना कशास भिती
जय देव जय देव ....||
शाळा-कॉलेजांतूनी घेऊन सुट्टी किंवा मारूनी बुट्टी
जोड्याजोड्यांनी करती भटकंती
जन्मोजन्मींच्या शपथा घेती, वचने देती
तुम्हीच जाणे कितीजण ती निभविती
जय देव जय देव ....||
संचार तुमचा सर्वत्र असे, पवित्र असे
प्रेमापेक्षा थोर भावना नसे
प्रेमामुळे जगी सुखही लाभे अन शांतीही लाभे
मैत्री, विश्वासाचे विणले धागे
जय देव जय देव ....||
मामी ..धमाल आहे ....
मामी ..धमाल आहे ....
लाल्या अन लालीचे ठरती बेत,
लाल्या अन लालीचे ठरती बेत, डिटेलमध्ये नीट<<<
(No subject)
(No subject)
धमाल आहे कविता!
धमाल आहे कविता!
मामी सकाळी सकाळी लोळवलेस
मामी सकाळी सकाळी लोळवलेस
मामी १४ फेब्रूवारीच्या
मामी
१४ फेब्रूवारीच्या आरतीचा प्रसाद १४ नोव्हेंबरला मिळेल.
सही जमलीय.. अगदी तालासुरात ..
सही जमलीय.. अगदी तालासुरात ..
मामी... लाल्या-लाली...
मामी... लाल्या-लाली... मस्तये!!!
श्री ..
येता फेब्रुवारी १४ तारीख, जरी
येता फेब्रुवारी १४ तारीख, जरी महिना बारीक
भेटवस्तूंचा हा वाहे महापूर
लाल्या अन लालीचे ठरती बेत, डिटेलमध्ये नीट
मामी रॉक्स..... धम्माल.....
मामी रॉक्स..... धम्माल..... ( खो खो हसणारी बाहुली)
(No subject)
धन्यवाद लोक्स! १४
धन्यवाद लोक्स!
१४ फेब्रूवारीच्या आरतीचा प्रसाद १४ नोव्हेंबरला मिळेल.
>>> श्री, किती तो कॉन्फिडन्स!!!
(No subject)
:d
मामी
मामी
जाम आवडली महाकवियत्री आहात
जाम आवडली
महाकवियत्री आहात मामी
अफलातून मामी.
अफलातून मामी.
मामी खासंच १४
मामी खासंच
१४ फेब्रूवारीच्या आरतीचा प्रसाद १४ नोव्हेंबरला मिळेल. >>>> श्री सिक्सर
>>जन्मोजन्मींच्या शपथा घेती,
>>जन्मोजन्मींच्या शपथा घेती, वचने देती
>>तुम्हीच जाणे कितीजण ती निभविती
भारीच....!
मामे यू रॉक.. शीर्षकापासून
मामे यू रॉक..
शीर्षकापासून हसू आलं ते शेवटापर्यंत...
मला तू फेब्रुवारीला बारीक म्हणाल्याचं तर महान हसू आलंय.. आणि लाल वर कित्ती राग
आपल्या प्रतिभेस नमस्कार!!!
धम्माल आहे लाल्या अन लालीचे
धम्माल आहे
लाल्या अन लालीचे ठरती बेत, डिटेलमध्ये नीट<<<
मामे... दंडवत गं
मामे... दंडवत गं
पकाऊ
पकाऊ
(No subject)
काय भारी आहे आरति. चालीत पण
काय भारी आहे आरति. चालीत पण बसते आहे. मन लावून टाळ वाजवत म्हणणार्या आजीबाई डोळ्यांसमोर आल्या.
लई भारी हाय..जागतिक बदाम दिवस
लई भारी हाय..जागतिक बदाम दिवस
श्री, किती तो
श्री, किती तो कॉन्फिडन्स!!!>>>>
जय मामी ! जय जय मामी !! ( आज
जय मामी ! जय जय मामी !!
( आज दारात लाल फुलांचा ढीग पडला असेल नै )
बहोत बढीया संत व्हॅलेंटाईन
बहोत बढीया संत व्हॅलेंटाईन मामी!
मज्ज्जेदार ......
मज्ज्जेदार ......
Pages