माझ्या जिण्यास तेव्हा हसलेच सर्व होते

Submitted by हर्षल वैद्य on 11 February, 2013 - 11:47

मुडदे मुघल् तळ्याशी पुरलेच सर्व होते
घोडे चुकार तेथे अडलेच सर्व होते

का ऐकवीत होतो मी आर्त प्रेमकविता
पर्वा तिला कशाची ? (ठरलेच सर्व होते)

बांधू पहात होतो प्रारब्ध मी तिच्याशी
वेडे जुनाट धागे विरलेच सर्व होते

ढाळू नका कुणीही अश्रू चितेसमोरी
माझ्या जिण्यास तेव्हा हसलेच सर्व होते

जेथे विसावलो मी त्यांनीच घात केला
वासे उभ्या घराचे फिरलेच सर्व होते

धर्मास कोण जागे ? कोणास न्याय पटतो ?
बाहुबली, ठरवण्या, भिडलेच सर्व होते

मी रात्रिचा प्रवासी, माझ्या अनन्त वाटा
दिवसातले ठिकाणे सरलेच सर्व होते
-- हर्षल वैद्य

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे शब्दयोजना!

बांधू पाहत होतो प्रारब्ध मी तिच्याशी - येथे 'पहात' असे करावे लागेल.

पारंपारीक खयाल आले आहेत.

सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

पाहत आणि पहात ही चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद. मूळ वहीत लिहिताना पहात असेच लिहिले होते पण टायपताना चुकले बहुतेक.