खादाडी : दादर ते फोर्ट

Submitted by नीलू on 11 February, 2013 - 11:10

दादर ते फोर्ट मधल्या व आसपासच्या खादाडीसाठी नवीन धागा.
या भागातल्या खादाडीबद्दलही लिहा.

या परिसराच्या खादाडीचा धागा मला दिसला नाही म्हणून हा धागा चालू केला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शनिवारी काळा घोड्याला गेले तेव्हा तिथली अमाप गर्दी पाहून काहीही न बघता तिथून काढता पाय घेतला. पण काळाघोड्याची फेरी अगदीच फुकट गेली नाही. काळाघोडा जत्रा ज्या रस्त्यावर असते त्याच्या बाजूच्याच गल्लीत म्हणजे रिदम हाऊस च्या बाजूची गल्ली. एक दोन ईमारती सोडून उजव्या बाजूला खालीच असलेले ' अयुब'स' ह्या छोटेखानी हॉटेलात जायचा योग आला. आम्ही घेतलेले चिकन रेशमी रोल विथ ग्रीन मसाला आणि चिकन बैदा रोटी (पराठा टाईप) अतिशय अतिशय अप्रतिम चव !!
हॉटेल छोटेखानी असल्याने बहुतेक जनता काउंटर वर पार्सल घेऊन बाहेर रस्त्यावर उभे राहूनच खातात. मैत्रिणीने तिथे जायचा आग्रह केल्यावर ते बघून प्रथम मला तिथे खायचा खूप कंटाळा आलेला पण मी तिथे खाल्ले नसते तर खूप काही मिस केले असते. Proud

कधी तिथे गेल्यास नक्की भेट द्याच.

एक दोन ईमारती सोडून उजव्या बाजूला खालीच असलेले ' अयुब'स' ह्या छोटेखानी हॉटेलात जायचा योग आला

>>
ते नाहीय सध्या तिथे. फिर फिर फिरलो.... Sad

माझ ऑफिस फोर्ट ला असल्याने खादाडीचे भरपुर ऑप्शन्स मला माहितेय्त.. Proud
एस ए ब्रेल्व्ही रोड वरच उडिपी हॉटेल.. शांघाय राईस आणी ईडली चिली खासच.. इतर पदार्थ यथातथाच...
कॉफी हाऊस आय सी आय सी आय बँक समोर.. संपुर्ण मेनु कार्ड अप्रतिम... चिकन पॉट राईस, चीज टोमेटॉ सॅडंवीज, सुप, असं बरच काही..
अकबरीज अली च्या समोर च्या गल्लीत से ची़झ... बर्गर, पास्त्यासाठी उत्तम पर्याय..
खाऊ गल्लीतला बटर वडापाव..
बाझार गेट लेन मधले एक छोटेसे समोसा वाल्याकडची दही कचोरी..
अ‍ॅक्सीस बँक च्या कॉर्नर वर असणारे लस्सी आणि छास... हे ह्याच्याकडचच अप्रतिम आहे इतर ठिकाणीची मला टेस्ट मला आवडली नाही...
जिमी बॉय चे चिकन टिक्का सॅड्विज..
तसेच हॉर्निमन सर्कल ला घरगुती जेवण घेऊन येणार्‍या बायकां कडचा जवळा निव्वळ अप्रतिम.. (आत्ता पावसाच्या त्या नाही येत, पण इतर सिझन मधे नेहमी असतात.)
सिध्धार्थ कॉलेजच्या समोरच्या गल्लीत रोशनी पाँइट म्हणुन एक छोटेखानी फूड स्टोअर आहे.. तिथल सर्वच पारशी पध्धतीचं कटलेट्स, सँड्वीजेस खुप मस्त..
याझदानी मधील बन मस्का (इथल्या बन्स चा सुवास आमच्या ऑअफिस पर्यंत येतो Wink )
अजुन आता आठवत नाहियेत, आठवले कि लिहिते..

पंचम पुरीवाला नाय लिवलात...
गिरगाव ग्रँटरोड लिहायला बसलो तर सर्वर ओरडेल म्हणून थांबतो Wink

हो हो उपास... पंचम पुरीवाला झक्क्कास आहेच.

त्याजवळच त्या कमानींच्या मध्ये कामतांच सुविधा पण बरंय.

चर्चगेट स्टेशन जवळ, बसस्टॉपच्या मागे ईराणी (हॉटेल चं नाव - स्टेडिअम) तुलनेनी बर्यापैकी स्वच्छ. इथला चहा, मस्कापाव, ऑम्लेट मस्त...

त्याबाजूला टी बोर्डाच्या ईमारतीत (नाव - रेशम भवन) टी सेंटर. आरामात बसून अजिबात घाई न करता मस्त गप्पा मारत वेगवेगळ्या प्रकारचे चहा घेता येतात. तिथे वेटर ला बोलवायला बेलही ठेवलेली असते. खूप महागही नाही.
त्याच ईमारतीत डावीकडच्या कोपर्‍यात वेगवेगळ्या प्रकारचे चहा विकत मिळतात. रोज टी, जस्मिन टी, यलो टी वगैरे.

याच्या बाजूला शिवसागर वगैरे आहेत पण कधी ट्राय नाही केलेत.

विरूद्ध लेन मध्ये गेलॉर्ड बेकरी. ईथे सकाळी गरम ताजा पाव, अन बेकरी आयटेम्स मस्त मिळतात.

त्यापुढे, त्याच लेन मध्ये, अगदी वळणावर, पिझ्झा बाय द बे. जरा महाग पण छान रेस्टो. संध्याकाळच्या वेळेस पिझ्झा भाजल्याचा दरवळ असतो...

स्टेडिअम माझं अत्यंत आवडतं इराणी आहे. ते अजून टिकून आहे म्हणून बरं वाटतंय. Happy
त्याच लायनीत एक चायनीज आहे. तिथे मागे खाल्लं होतं. का माहित नाही खूप तेलकट वाटलं जेवण (आणि एसी+चर्चगेट कॉम्बोमुळे असेल पण प्रचंड महाग वाटलं). अ़जून पुढे गेलं की कसाटा खायचो त्या आयस्क्रीमच्या जागेचं नाव विसरले. आहे अजून बहुतेक.

अ़जून पुढे गेलं की कसाटा खायचो त्या आयस्क्रीमच्या जागेचं नाव विसरले >> तिथे आता बास्किन रॉबिन्स आहे.