लग्न आणि मी..

Submitted by रमेश भिडे on 11 February, 2013 - 11:09

(माझा भाचा सुधांशु याने व्यक्त केलेले मनोगत , आपला बहुमोल सल्ला अपेक्षित! ) साभार- L.शुधांशू

वास्तविकत: माझं लग्नाचं वय झालेलं नाहीये अजून (येत्या मे मध्ये २४ चा होईन); but on the verge of attaining that state, being eligible for marriage! पण हल्ली बर्याचदा लग्नाबद्दल नाना प्रकारचे विचार मनात डोकावत असतात, खूप सारे प्रश्न पडतात. त्यात काही लोकांनी आधीच भीती घालून ठेवलीये; "बाबा रे लवकर दोनाचे चार कर, नंतर फार अवघड होतं; हल्ली सरळ वळणाच्या मुली तश्याच कमी, उशीर नको करूस." अरे देवा! पण एवढ्या लवकर! :O

असं काही कानावर पडलं कि तर हमखास विचारचक्र सुरु होतंच. मग आपल्याला कशी मुलगी हवी ते थेट संसार कसा करायचा इथपर्यंत planning होतं आणि नकळत आपण खूप mature असल्याचा feel येतो (कधी-कधी असे विचित्र (?) विचार मनात घोळले कि स्वत:शीच हसतो सुद्धा). आपल्याला "हवी तशी मुलगी" ( The term is relative) मिळेल का? हा प्रश्न फारच गंभीर आहे. Practically 'हवं तसं' कुणी मिळणं अवघडच; पण साधारण वेव्लेन्थ तरी जुळायला हवी (किंवा जुळवून घेण्याजोगी तरी हवीच).

काही लोकं घाबरवतात सुद्धा; "आजकालच्या मुला-मुलींचं काही सांगता येत नाही रे, जाम लफडी असतात." झालं..इथे risk factor सुद्धा उगवतो; मग लग्न म्हणजे एका प्रकारचं Gambling वगैरे वाटायला लागतं. "म्हणूनच मी म्हणतो रे सुधांशू, love marriage is always preferable." पण Love (लग्नापूर्वी) आपला 'खंड' नाही हो; कुणी कितीही महात्म्य सांगितलं तरीही (But probability of happening the event can't be denied, it's purely logical).

माझ्या मते लग्न ही एक Compound विचारसरणी आहे, दोन विचारांना एकत्र आणणारी; भावनांना जुंपणारी. मग अश्या विषयावर थोडा विचार केला तर काय बरं वावगं? आणि ह्या विचारातही वेगळीच गंमतही असते.
आपल्या इथली संसारी काका-दादा मंडळी आपले वैवाहिक अनुभव बर्याचदा generic terms (with an element of humour) मध्ये मांडत असतात आणि 'नात्यातला ओलावा' नकळत सांगून जातात. मग काय माझं वैचारिक आवर्तन पुन्हा सुरु!

एकंदरीत पाहता मला ह्या विषयावर फारशी माहिती नाही; माझ्या मनात जे काही चाललंय, ते मी इथे शब्दबद्ध केलंय एवढंच. तसे अजून बरेच विचार आहेत, पण तुम्हाला अजून बोअर नाही करणार मी. हे सगळ थोडंस weird असेलही, पण express होणं हे ध्येय असल्याने हा लेखन'प्रपंच'. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार चांगल्या प्रकारे व्यक्त झालाय सुधांशु... पण लग्नासारखा गंभीर विषय .. आणि विरंगुळा या सदरात?????

लग्नासारखा गंभीर विषय पण सुधांशुने फारच हळुवारपणे व्यक्त केल्या आहेत त्याच्या भावना !