'नाटक '

Submitted by सुशांत खुरसाले on 10 February, 2013 - 09:03

एकदा 'तो'नाटकाला गेला . 'ती' सुद्धा तेथे येईल असे त्याला वाटले.. (माणसाच्या मनात असे काही
चाभरे पण प्रामाणिक खयाल असतातच..) मग ती आली की नाही, वाचा.........

आले देशपांडे
आले कुलकर्णी
ह्रदीची सम्राज्ञी
आहे कोठे ?

नाट्यरंगी सारा
रंगला श्रुंगार
वाटतो भंगार
तुझ्याविना ||

डोळे वाटेकडे
लावून बसलो
गालात हासलो
क्षणभर ||

अन् काय आश्चर्य
आलीस तू तेथे
बसलो मी जेथे
एकटाच ||

मज सोडूनीया
तू पाहशी नाटक
हे वागणे त्रोटक
बरे नव्हे ||

झालीस तू कधी
नाट्याची रसिक
बापुडे आशिक
न दिसतात ||

पण दैवे केली कॄपा
ती पाही मजकडे
हे उर धडधडे
जोरदार ||

गुलाब समोरी
की होता निशिगंध
मी उरातले स्पंद
झाकलेले ||

मी म्हटले मनाला
रे बोलावे ते काय?
उगा नको हाय-बाय
जीवघेणे ||

आणि मग माझा
ती हात घेई हाती
भलतीच प्रीती
उफाळली ||

पण झाले अघटित
ती सोडूनीया गेली
दिल तोडूनीया गेली
पामराचे ||

उगाचच तिला
मी शोधतो-पाहतो
नी मनात राहतो
ध्यास तिचा ||

भाबड्या मनाला
झाला तिचा भास
वेडी तिची आस
सोड आता || ---------------------------------------------------------------------------------- आणि शेवटी हे 'भासां'चे नाटक संपल्यावर ..... ती न आल्याच्या दु:खात त्याने खरडलेल्या काही ओळी...(स्फुटे)

नाट्य संपले
पडदे पडले
स्वप्नढगांतून
मन ते उडले..

वाटे आता नको प्रीत ही ,
वाटे आता नको कहार
कशी गर्जतो विरहसागर अन्
स्वप्नफुला कधी येई बहार !

------------------------------------------------------------------------------------ (संपूर्णपणे काल्पनिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओवी प्रकाराने आजपर्यंत महाराष्ट्राला भरभरुन दिले....
'प्रियेचे अभंग ' या पुस्तकाच्या नावावरून हा प्रकार सुचला. म्हणून योग्यता नसतानाही हे लिहिण्याचे
धारिष्ट्य केले. चूक भूल झाली असल्यास क्षमस्व .बाकी आपल्या हाती.
धन्यवाद !!

<<<<<ओवी प्रकाराने आजपर्यंत महाराष्ट्राला भरभरुन दिले....>>>>

हि ओवी नव्हे ,अभंग आहे.वैभवने लिहलेच आहे.ओवीत तिन्ही ओळीत यमक असते. मजेशीर Happy

समीरजी ,विक्रांतजी,वैवकु ,उकाका सर्वांचे मनापासून आभार!
हि ओवी नव्हे ,अभंग आहे.>>>> हो विक्रांतजी बरोबर आहे आपले म्हणणे....ओवी,अभंग इ.सर्वांनीच आपल्याला भसभरून दिले असे म्हणायचे होते मला...असो
...गै.न.

मी त्या अर्थाने नव्हतो म्हणालो
एकंदर ......मूळात ओवी हा छंद आहे जो मराठीत वापरतात अनेक्जण

माझे निरीक्षण असे की हा गायत्री छंदावरून विकसित झालाय

गायत्रीत ६-६-६-६ अशा अक्षरसंख्येचे चार चरण असतात

ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी हे सूत्र काटेकोरपणे नाही पाळले कारण त्याना अभिव्यक्तीपेक्षा विचारावर जास्त भर द्यायचा असावा त्यामुळे अक्षरसंख्या व यमकाच्या जागा त्यांच्या लेखनात अनेकदा बदलताना दिसू शकतात

माझ्या मते अभंग हा एक काव्यप्रकार आहे (गझलेसारखा )ज्यात एकाच विषयास मांडणार्‍या (मुसल्सल) अनेक ओव्या अर्थबोधासाठी अभंगपणे जोडल्या जातात हा प्रकार तुकोबांच्या लेखनात मुख्यतः आढळतो

मोरोपंतांनी जरा गडबड करूण ठेवली असे माझे मत आहे ओवी ज्ञानेशाची व अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची असे ते म्हणाले होते

या बाबतीत मला सर्वाधिक आवड्ते ती बहिणाबाई म्हणे ती अशिक्षित होती पण तिने तिच्या ओव्यांमध्ये अक्षरसंख्येचा ८-८-८-८ हा फॉर्म अजिबातच चुकवला नाही कधी

~वैवकु

______________________________

सर्व मते वैयक्तिक आहेत
चूक भूल द्यावी घ्यावी

हो खरोखरच बहिणाबाईंच्या रचनांत अर्थाच्या प्रगल्भपणासोबतच 8-8-8-8 ची अचूक मांडणीही दिसते.
<<<ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी हे सूत्र
काटेकोरपणे नाही पाळले कारण
त्याना अभिव्यक्तीपेक्षा विचारावर जास्त भर
द्यायचा असावा त्यामुळे अक्षरसंख्या व
यमकाच्या जागा त्यांच्या लेखनात
अनेकदा बदलताना दिसू शकतात>>>> खरंय. तुकोबांच्या बर्याचअभंगांत मात्रासंख्या मात्र समान असते ...असे जाणवते.
अशीच चर्चा होऊन नवनवीन वाचायला व शिकायला मिळावे हीच इच्छा.!