नेमो - दि ब्लिझर्ड

Submitted by गोपिका on 10 February, 2013 - 00:50

नुकतच यु एस ए इथे 'नेमो' हे बर्फाच वादळ येउन गेल.....ब्लिझर्ड म्हणजे बर्फाचे वादळ(snow storm) असे साध्या शब्दात म्हणता येइल.....

साधारण १२ इंच किव्वा जास्त बर्फ साठला होता....पण ह्या वादळाचा सामना करणार्‍या इथल्या लोकांचे जितके कौतुक करावे तितके थोडे

वेळो वेळि स्वतः चि काळजि न करता रस्त्यावरचा बर्फ काढुन गाडि चालविणार्‍यांचि अणि पादचार्‍यांचि सोय करणार्‍या त्या सिव्हिल सर्व्हिस च्या सेवेकर्‍याना सलाम
१.
IMG_1250.JPG
२.
IMG_1252.JPG
३.
IMG_1254.JPG
४.
IMG_1261.JPG
५.
IMG_1262.JPG
६.
IMG_1263.JPG
७.
IMG_1264.JPG
८.
IMG_1265.JPG
९.
IMG_1266.JPG
१०.
IMG_1268.JPG
११.
IMG_1275.JPG
१२.
IMG_1277.JPG
१३.
IMG_1290.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे कितीही हॉरिबल असलं तरी बघायला मस्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त वाटतय
(दुरुन स्नो फॉल साजरे Proud )

हे कितीही हॉरिबल असलं तरी बघायला मस्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त वाटतय >> +१ Happy
काही प्र.ची. अंगावर य्तायेत ....... गार गार ....

स्नो फोल मधे मजा येते असे म्हणणार्‍यांना फक्त एकदाच फूटभर ओला स्नो साफ करण्याची शिक्क्षा देण्यात यावी. - हुकूमावरून Lol

सगळ्यांचच म्हणण पटतय मला.....ते सत्यच आहे....

दुरुन स्नो फॉल साजरे - ---अगदि खर....नुस्ति फॅ फॅ उडते Lol

स्नो फोल मधे मजा येते >>> अस कधि कधि मे ही म्हणतेधन्य

सर्वाना खुप खुप धन्यवाद Happy

बर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र ...... २० डिग्री सेंटिग्रेडला हुडहुडणारे आम्ही मुंबईकर! हे बघून धडकीच भरलीये. गाड्यांना आयसिंग फासून ठेवलेल्या दिसताहेत. बेंचाची गादी झालीये. झाडांनी जाडजूड कानटोप्या घातल्यात आणि रस्त्यावर हिमनद्या अवतरल्यात.

मग ऑफिसात काय स्लेजवरून जाता की काय???? Wink Proud

मस्त प्रचि. धन्यवाद. Happy

<< त्या सिव्हिल सर्व्हिस च्या सेवेकर्‍याना सलाम >> १००% सहमत. भितीदायक परिस्थिती असूनही केवळ त्या कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेवरील गाढ विश्वास तेथील लोकाना व माझ्यासारख्या त्यांच्या इथल्या नातेवाईकाना निर्धास्त ठेवतो.
'ब्लिझर्ड'ची अचूक कल्पना देणारी छान प्रचि. !

'ब्लिझर्ड'ची अचूक कल्पना देणारी छान प्रचि. ! >> भाऊ no offense meant really, पण फोटो बघून हे प्रकरण काय असते ह्याची कल्पना येणे कठीण आहे. जवळ जवळ शून्य visibility असते , बाहेर वारे ३०-७० mph speed ने घोंघावत असतात, तापमान बहुधा शून्याच्या (Fahrenheit) आसपास रेंगाळत असते, wind chill धरून बोचरा वारा हा शब्द मुलायम वाटावा अशी परिस्थिती असते. परत पडणारा स्नो हलका आहे कि जड moisture reach ह्यावर त्याचे वजन नि साफ करण्यासाठी लागणारी मेहनत ठरणार असते. कधी तरी ह्यात freezing rain नि sleet हे घसरडे नि साफ करायला अतिशय त्रासदायक प्रकार अ‍ॅड होतात. झाडे पडून पॉवर कट चा धोका असतो (हिवाळ्यात पॉवर नसणे हि अतिशय चिंताजनम गोष्ट आहे कारण हिटींग सिस्टीम ची बोंब लागते, परत अशा वादळांमधे ती पटकन restore होणार नाहि हेहि नक्कीच असते). परत अशावेळी हजार वेळा warning, public announcements, media announcements नंतरही काही लोक आपला commons sense गहाण टाकून बाहेर असतात नि आपल्या बरोबर emergency सर्व्हिस च्या लोकांचाही जीव धोक्यात टाकत असतात.

इतक्या वर्षांनंतरही blizzard म्हटले कि अजूनही काटा उभा असतो अंगावर.

<< पण फोटो बघून हे प्रकरण काय असते ह्याची कल्पना येणे कठीण आहे. >> असामीजी, No offence taken really ! कारण, गेले दोन दिवस आपण सांगितलंत तेंच 'रनींग कॉमेंटरी' व सोबतीला वेबकॅमवरचं 'लाईव्ह कव्हरेज' असं मीं माझ्या अमेरिकेतील मुलीकडून ऐकतो, पहातो आहे.

फोटो मस्त. Happy
स्नो म्हणजे 'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट' ह्याचा अनुभव मिनेसोटात राहून भरपूर घेतला आहे.

<<<<<<अशावेळी हजार वेळा warning, public announcements, media announcements नंतरही काही लोक आपला commons sense गहाण टाकून बाहेर असतात नि आपल्या बरोबर emergency सर्व्हिस च्या लोकांचाही जीव धोक्यात टाकत असतात.>>>>>>> नहितर काय......घरात बसुन राहिल तर काय नडतय तेच कळत नाहि.....शिवाय हे लोक बाहेर पडले कि परतेपर्यंत घरच्यांनि काळजि करायचि ति वेगळिच

प्रत्यक्ष वादळाचे फोटो काढुन त्याचि भयानकता अणि तीव्रता समोर आणण्याचि इच्छा होति...पण सगळे इतके भयानक होते कि मि आणि माझा कॅमेरा दोघांचि हि शाश्वति राहिलि नसति.......म्हनुण सकाळि उठल्या उठल्या कॅमेरा घेउन तडक बाहेर निघाले...ह्या वादळाने किति थैमान घातले हे सगळ्यान सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न होता......

कोणीतरी अशा वेळेस दैनंदिन जीवन कसे चालते यावरही लिहा. >> चालते ? Happy ठप्प असते. शुक्रवारी state emergency जाहिर केली होती. चार नंतर highway traffic वर बंदी होती. public offices लवकर सोडण्यात आलेली होती नि private office s ना त्यांचा निर्णय घ्यायचा असतो जो फारसा वेगळा नसतोच. बहुतेक ठिकाणी लोकांना घरून काम करणे शक्य नसेल तिथेच लोकांनी जावे असे सुचवलेले होते. लोकांनी बहुतेक super markets essential supply like food, water, medicine वगैरे साठी रिकामी (and I'm not kidding here, you can google for snaps) केलेली होती. power cut च्या धोक्यामूळे पर्यायी व्यवस्था शोधून ठेवा अशा सूचना दिलेली होत्या, shelters तयार केलेले होते, power companies अधिक कर्मचार्‍यांबरोबर stand by वर होत्या. homeguards deploy केलेले होते. costal regions मधे tide damage साठी बर्‍यापैकी तयारी केलेली होती.

बाबौ !!!!!!!!!!!!!!!!!!!!
डेन्जर प्रकार आहे की.

लोकांनी बहुतेक super markets essential supply like food, water, medicine वगैरे साठी रिकामी (and I'm not kidding here, you can google for snaps) केलेली होती>> अगदी अग्दी! आम्ही ३ सुपरस्टोअरला फिरल्यावर ब्रेड मिळाले होते,बीजेजला बेगल साथी बेकरि बाहेर लोक रा.न्गेत उभे होते .
लाइट गेले तर कु.न्कि.न्ग पासुन ही.न्टी.न्ग पर्य्त मोस्टली सगळेच ब.न्द होते मग सिरियल-दुध ,फळ जॅम ब्रेड भागावयचे..