अद्भुत (भाग 5 )

Submitted by Mandar Katre on 9 February, 2013 - 13:51

5

अॅलेक्सच्या संगतीत रोहनचा दिवस छान गेला. दुसर्या दिवशी विपश्यना शिबीर सुरू होणार होते. त्यादिवशी सकाळी अॅलेक्स आणि रोहनने फॉर्म भरून रीतसर प्रवेश घेतला व इतर सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायला दुपार झाली.शिबिराला सुमारे 150 पुरुष व तितक्याच महिला होत्या. इथले जेवणही रोहनला आवडले. साधेसेच ,पण सात्त्विक आणि पौष्टिक ... त्या रात्री मौनाला सुरुवात झाली .आजपासून दहा दिवस मौन पाळायचे. रात्री खोलीत गप्प बसणे दोघांनाही अवघड जात होते . तरीही मनाचा निश्चय करून ते निद्राधीन झाले.

दुसर्याा दिवशी आनापान सती ,तिसर्याु दिवशी ध्यान-त्रिकोण एकत्रीकरण शिकवले गेले. रोज संध्याकाळी गोयंका गुरुजींचे रसाळ प्रवचन व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले जाई. चौथ्या दिवशी विपश्यना दीक्षा दिली गेली.त्या दिवशी रोहनला खूप निराळा अनुभव आला. त्यानंतर रोज सर्वांग प्रदक्षिणा, अधिष्ठान, धारा-प्रवाह वगैरे कौशल्ये शिकवली गेली. दहाव्या दिवशी मंगल-मैत्री साधना झाली.आणि मौन सुटले.रोहनला मनावरील बरीच ओझी उतरल्याचा,मन शुद्ध झाल्याचा खोलवर अनुभव आला होता.

मग सर्वांनी ओळखी करून घेतल्या,आणि मेजवानीचा आस्वाद घेतला. इतकी सगळी व्यवस्था आणि तीही एका पैशाचीही अपेक्षा न ठेवता? खूप आश्चर्यकारक होते. दान काऊंटर वर जावून त्याने दानाची रक्कम जमा केली.आणि मग तो आणि अॅलेक्स विपश्यनेच्या अनुभवांवर गप्पा मारू लागले. रोहनने आपल्या प्रवासाबद्दल आणि लडाखच्या मठाबद्दलही अॅलेक्सला सांगितले .

शिबीर संपायला अजून एक दिवस होता. दुसर्या दिवशी सकाळी प्रवचन होवून शिबीर समाप्त झाले. निघताना तिथल्या आचार्यांनी भिक्खु धम्मपाल यांना देण्यासाठी एक पत्र रोहनजवळ दिले. आणि मग तो आणि अॅलेक्स विपश्यना आश्रमाबाहेर पडले. रोहनने सांगितलेले दिव्य स्वप्न आणि चमत्कार ऐकून अॅलेक्सच्या मनातही लडाखच्या मठाबद्दल आकर्षण आणि उत्सुकता निर्माण झालेलीच होती.त्यामुळे तोही रोहनसोबत लेहला निघाला. त्यांनी धरमशालामध्ये इतर ठिकाणे आणि लामांचा मठही पहिला. एका अनामिक ओढीने तिथून पाय निघत नव्हता तरीही लेहची बस पकडून रात्री दहा वाजता लेहला पोचले. आणि मग त्याच मागच्या वेळच्या लॉजवर दोघेही थांबले.

सकाळ झाल्यावर पुन्हा पर्वत चढायचा होता म्हणून दोघांनीही भरपूर नाश्ता आणि दूध घेतले, आणि पर्वत चढू लागले.यावेळी रस्ता ओळखीचा असल्याने रोहनने गावकर्यांणच्या मदतीशिवाय स्वत:च वर जाण्याचा निर्णय घेतला . ते मठात पोचले तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. पूर्वीप्रमाणेच छोट्याने पुन्हा स्वागत करून त्यांना खोलीत नेले. फ्रेश होवून गुरुजींच्या भेटीला गेले.

गुरुजींनी त्यांचे स्वागत केले. रोहन नमस्कार करून गुरुजींना म्हणाला………….. गुरुजी विपश्यना ही साधना खूप चांगली आहे. मला खूप मोकळे वाटते आहे आता, आणि यापुढे आयुष्यात कोणतेही व्यसन न करण्याचा मी निश्चय केला आहे........ फार छान! गुरुजी म्हणाले....... अरे पण या मित्राची ओळख तर करून दे आधी..... मी काय ओळख करून द्यायची गुरुजी?आपण सर्व जाणत असालच ! तुमच्याविषयी मी याला जे सांगितले,त्याने प्रभावित होवून हा इथे आला आहे. हा मूळचा जर्मनीचा, अॅलेक्स. भारतात आध्यात्मिक अनुभूतीच्या शोधासाठी आला आहे गुरुजी.............

ठीक आहे बेटा. एक लक्षात ठेव ,पूर्वजन्मीचे काहीतरी लागेबांधे,संस्कार असल्याशिवाय कोणत्याही मनुष्याचे पाय या मठाकडे वळायचे नाहीत. ज्याअर्थी हा तुझ्याबरोबर इकडे आला,त्याअर्थ त्याचाही तुझ्या आध्यात्मिक आयुष्याशी काहीतरी संबंध असणारच! कळेल ते लवकरच.............. आता लवकर जेवून घ्या पाहू!...........गुरुजी म्हणाले.

त्यादिवशी जेवणानंतर एक विशिष्ट पद्धतीने बनवलेले एक तिबेटी पेय त्या दोघांना देण्यात आले. ते प्यायल्यावर त्यांना एक निराळीच हुशारी वाटू लागली.दोघेही झोपले. रात्री बरोबर तीन वाजता गुरुजींनी रोहनला उठवले . अॅलेक्सला आत्ता उठवू नको असे खुणेनेच सांगून रोहनला घेवून गुरुजी एका उसर्या बाजूच्या गुप्त खोलीत गेले. तेथे जाताच त्याला झोपवले,आणि सम्मोहन सूचना देवून त्याला सम्मोहित केले. ...............आता मी 1 ते 10 अंक म्हणतो, त्याबरोबर तू तुझ्या पूर्वजन्मात जाणार आहेस. तिथे कायकाय घडते, ते तू मला सांगायचेस .............................

(क्रमशः)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users