|| या साठीच तर केला होता अट्टहास ||

Submitted by विनायक. दि.पत्की. on 9 February, 2013 - 03:15

नोकरी साठी हिंडलो वनोवनी,
तेव्हा निवृत्ती अमुचा ध्यानी न मनी.
नौकरी हे एकच लक्ष,
कारण बेकारीची होती साक्ष.
तपासल्या जाहिराती केले अनेक अर्ज,
प्रसंगी काढले व्याजाने सुद्धा कर्ज
वाट पाहता पाहता लागली वाट,
वर घरचे म्हणती अरे संसार थाट.
नवस झाले,ज्योतिष पहिले,
प्रसंगी डोळ्यात अश्रू उभे राहिले.
अचानक फिटलें एकदाचे पारणे,
नौकरीचे आले खास बोलावणे.
झाली एकदाची अग्नी परीक्षा,
साहेबाकडून मिळाली कामाची दीक्षा.
परगावी नौकरीचा संपला आनंद,
बदलीच्या विचाराने झाला परमानंद.
पुन्हा अर्ज पुन्हा भेटणे, आश्वासनाने तर आले ताटकळणे.
पुन्हा एकदा पारणे फिटले,
बदलीने डोळ्यात आनंदाश्रू दाटले.
आनंदाने काम करण्यात दंग,
चुकीने झाली नियमावली भंग.
चूक झाली होती अक्ष्यम,
पण शिक्षे चे ठिकाण होते रम्य.
आली परिपूर्णता, कामे न अडती,
प्रयत्नाने मग झाली बढती.
वाढला पगार,झाली प्रगती,
नौकरी ने च मिळाली चांगली संगती.
सदिच्छा सर्व नौकरीत झाल्या पूर्ण,
समाधानाने चिंता झाल्या चूर्ण.
म्हणून आज तुम्ही निरोप द्यावा खास
या साठीच तर केला होता नौकरीचा अट्टाहास

Group content visibility: 
Public - accessible to all site users