हे असे घडणार नक्की!

Submitted by सतीश देवपूरकर on 8 February, 2013 - 14:51

गझल
हे असे घडणार नक्की!
मी पुन्हा फसणार नक्की!!

आवरू दे बाडबिस्तर....
मी उद्या नसणार नक्की!

शेवटी काटे, अरे, ते....
एकदा रुतणार नक्की!

वाट ही काट्याकुट्यांची.....
पार मी करणार नक्की!

मी तुझ्या झालो हवाली!
काळजी मिटणार नक्की!!

घोकले तेही विसरलो....
आज ती रुसणार नक्की!

फाटले आभाळ इतके;
दगडही द्रवणार नक्की!

शेपटीवर पाय पडला....
तो मला डसणार नक्की!

प्राक्तना! मी शब्द देतो....
जिंदगी जगणार नक्की!

शीड आहे फाटलेले!
नाव भरकटणार नक्की!!

कोण सांभाळेल तुजला?
मद्य हे चढणार नक्की!

ओत तू पाणी कितीही,
वीष ते भिनणार नक्की!

पानगळ येते नि जाते!
मी पुन्हा फुलणार नक्की!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चार फुटक्या ओळी लिहुनि
समृद्धी फुरफुरते ज्यांची
दुसर्‍याला वाकुल्या दाविती
अन् स्वताच हे गरगरती नक्की!

ओळ फुटकी, की, नशिब आहे तुझे फुटके अरे?
काय समृद्धी कुणाची याप्रमाणे फुरफुरे?
वाचतानाही तुझी बुद्धीच गरगरते अशी;
फेस बघ आला तुझ्या तोंडास लिहिताना अरे!

चला आमचा वृत्तबद्ध लिखाणाचा रियाज तरी होत आहे कलगी तु-याच्या निमित्ताने का होईना! शिवाय गझलरसिकांचे मनोरंजनही होत आहे हे त्यांच्या प्रतिसादावरून व हास्यमुद्रांवरून दिसत आहे! हेही नसे थोडके!

सतीशजी,

ओत तू पाणी कितीही,
वीष ते भिनणार नक्की!

"वीष" असे लिहिणे चुकीचे आहे. असे मी म्हटल्यावरून २००८ला एका संकेतस्थळावर भयंकर वादळ आले होते. मला वेडेवाकडेही बोलले गेले होते. एकमेकांची खाजविण्यात गर्क असलेल्यांना त्यामुळे जरासा धडा मिळाला होता, असे मानायला हरकत नाही. अर्थात, त्यावरून एक हझलही मी रचली होती, हे माझ्या दृष्टीने अधिक.

अ. अ. जोशीजी,

वीष शब्द चुकीचा आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला? आम्ही समजलो नाही! तसेअसेल तर मग तो शब्द कसा लिहावा?

दीन शब्द अन् हीन भाषा
तुम्हाकडून असलीच अपेक्षा
तुम्हा काव्य ना जमते तरी
परी कांगावा खास जमतो नक्की!

काय तू आलास इकडे, वाटले गेलास तू!
शायरी केवीलवाणी का पुन्हा करतोस तू?
जे म्हणायाचे तुला गद्यात का नाही म्हणत?
का असा करतोस खीमा खुद्द काव्याचाच तू?

Rofl

>>>वीष शब्द चुकीचा आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला? आम्ही समजलो नाही! तसेअसेल तर मग तो शब्द कसा लिहावा?<<<

Lol

तो शब्द कसा लिहावा?<<<
सोप्पय......अग्निहोत्रींच्या शब्दसंग्रहात पाहून लिहावा Wink

शेवटी काटे, अरे, ते....
एकदा रुतणार नक्की!
.
वाट ही काट्याकुट्यांची.....
पार मी करणार नक्की!

सुंदर शेर.

शेपटीवर पाय पडला....
तो मला डसणार नक्की!

जीवनावश्यक शेर.

>>जीवनावश्यक शेर.<<

मला हा प्रतिसाद खूप आवडला. अर्थ समजला नाही तरी खूप नाविन्यपूर्ण प्रतिसाद आहे.

गजलुमियां,

Essential Commodities Act, 1955. वाचा.

असे शेर शिकून घेणे सर्व भारतीयांसाठी सक्तीचे केले पाहिजे.
म्हणजे निष्कारण सापाच्या शेपटीवर पाय देण्याची परंपरा नष्ट होईल. Lol

अग्निहोत्रींच्या शब्दसंग्रहात पाहून लिहावा<<<<<<<<<<<
इथे अग्निहोत्रींपेक्षा विद्वान आसामी असताना कशाला धुंडाळायचे शब्दकोश?

सत्य टीका अन् गद्य खेटरे
तुम्हा का कळली नाही?
पद्य तुम्हाला कळते म्हणता
म्हणूनि रोख लिहतो नक्की

Pages