आभास

Submitted by Manasi R. Mulay on 8 February, 2013 - 01:03

तू कधीच नव्हतास कुठेच
पण चालताना तुझ्या सोबतीची उगाच सवय लागलेली
वाट सरळच होती थोडी तुझ्या दिशेने वाकलेली
पावलं माझीच फक्त तुझ्या खुशीनं टाकलेली
हवेतला गारवा रात्र चंद्राळलेली..
माझी पायवाट मोहक स्वप्नाळलेली..
अळवावरल्या पाण्याला नियती भाळलेली..
एक पावसाळी संध्याकाळ धुंद नाचलेली
मनात बरसणारा आषाढमेघ कधीच नव्हता..
फक्त एक सर वेडं होऊन वेचलेली..
आणि आजही तू नाहीसच
फक्त थोडी थंडी दाटलेली अन थोडी पानगळ सोसलेली..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Nice one!