FMCG सेक्टर

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

FMCG हे सेक्टरच मुळी equal wait वा under performer आहे. ( compare with other like Auto / infra etc). पण तरीही त्यातील काही चांगल्या कंपन्या ज्यात फायदा नक्की आहे.

डाबर -
मार्च मधील निकालानुसार गेल्यावर्षी पेक्षा साधारण ३३ टक्के विक्रीत वाढ तर ३० टक्यांनी नफ्यात वाढ आहे. P&L पाहाताना असे लक्षात येते की व्याज आता काहीही उरले नाही व interest cover ratio हा ४२ आहे. म्हनजे कंपनीची स्तिथी अत्युत्तम आहे. FY07 व FY08 ला साधारण ३.९ व ४.६ असा EPS प्रीडीक्ट केला आहे. म्हण्जे येत्या दोन्ही वर्षात कंपनीला मोठा नफा अपेक्षीत आहे.

५२ आठवडे लो - ९६.१०
५२ आठवडे हाय - ११९
आजची किंमत - १००

सध्याच्या १०० रु किमतीला हा समभाग पुढील वर्षीच्या नफ्याच्या फक्त २६ वेळेने (टाईम्स) ट्रेड करत आहे. आजचा p/e जर ३५ धरला तर हा समभाग १० p/e ने स्वस्त भेटत आहे.

MACD chart पण बाय रिकमंड करत आहे. व्हॉल्युम वर जात आहे. हा समभाग घेतल्यावर पुढील वर्षी फायदा नक्की होनार.

टाटा टी -

मी लिहायला घेतले तेव्हा हा ८७० ला होता (काल), हे पोस्ट करताना तो आता ९२३ झाला आहे. पण अजुनही तो साधारण ७ ते ८ टक्के वर जाउ शकतो कारण पुढील वर्षीच्या EPS वर तो ट्रेड करत आहे व तो ५३ आहे. अजुनही यात वर जान्याची शक्ती आहे.

Procter & Gamble

५२ आठवडे लो - ६२७.६०
५२ आठवडे हाय - १००५
आजची किंमत - ७८३
फंडामेन्टली खुप स्ट्रॉंग कंपनी.

३० जुन ला वर्ष अखेर आहे. गेल्या तिमाही निकालात मागील तिमाही निकाला पेक्षा जास्त नफा व विक्री झाली. तो ट्रेंन्ड कायम राहीला तर नक्कीच जुलै महीन्यात फायदा होऊ शकतो. दोन तिन दिवस वाट पाहुन जर ७५० च्या आसपास आला तर नक्की घ्यावा. बरीच अपसाईड उरली आहे. नक्की फायदा होईल. पण त्या साठी एकहाद्या मोठ्या ट्रेडर चे लक्ष जायला हवे कारण निग्लीजीबल व्हॉलुम ने हा शेअर ट्रेड करत आहे. ज्या दिवशी व्हॉलुम बुस्ट मिळेल त्या दिवशी नकीच ८५० क्रॉस होनार.

प्रकार: