स्प्लेंडिड क्वांग चौ - भाग १

Submitted by वर्षू. on 7 February, 2013 - 21:18

सध्या संपूर्ण चीन मधे,चायनीज नववर्षाच्या स्वागताची तयारी जोरात सुरु आहे. बसस्टेशन्स, रेल्वे स्टेशन्स वर लाखाच्या संख्येत लोकं मैलोमैल लांब शिस्तबद्ध रांगातून तिकिटं घ्यायला धैर्याने उभे आहेत.
ज्यांना या सुट्टीत त्यांच्या गावी जाता येत नाहीये, जे इथलेच आहेत अश्या लोकांना नववर्षाचे स्वागत भरपूर आनंदाने करता येण्यासाठी क्वांगचौ ही पूर्णपणे सज्ज झालंय.

इथे शहरामधेच मोठमोठाले पार्क्स आहेत. त्यातील सर्वात मोठा म्हणजे ,' युए शिउ' पार्क.
२१३ एकर जमीन व्यापलेला हा अवाढव्य पार्क शहराच्या मध्यभागी बनवलेला आहे. मूळच्या युए शिऊ पर्वतराजी पासून इथे सात टेकड्या, वेगवेगळ्या लेवल्सवर बनवण्यात आल्या आहेत.
मुक्त उडणारे आणी गाणारे पक्षी, प्रचुर मात्रेत असलेल्या विविध वनस्पती, दाट झाडी, उंचचउंच ,विस्तीर्ण झाडं यांच्यामुळे या पार्कला नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं आहे. इतकंच नव्हे तर जवळजवळ ५०,००० स्क्वेअर मीटर जागेत तीन मनुष्य निर्मीत तलाव आहेत.इथे बोटीतून फिरण्याची, मासे पकडण्याची हौस भागवून घेता येते. या तलावांभोवती पसरलेली मनोरम, सुंदर निसर्गदृष्ये आपल्या पेंटिंग्स मधून बंदिस्त करायला कलाकार लोकं जय्यत तयारीनिशी काठांवर बसलेले दिसतात.
अश्या ह्या विशाल पार्कमधे एक मोठा भाग , amusement park, व्यायामशाळा, पोहण्याचा तलाव , रेस्टॉरेंट्स, टोप्या, खेळणी आणी इतर सटरफटर वस्तू विकत मिळणारे लहान स्टॉल्स, आर्ट म्युझियम,

plant and flower viewing area यांनी व्यापलेला आहे.
शहरातील लोकांना मॉडर्न अ‍ॅमिनिटिज बरोबर, जंगलात जाण्याची हौस भागवून घेता यावी म्हणून शहराच्या मध्यभागी उभा केलेला हा पार्क , सध्या चायनीज नववर्षाच्या निमित्ताने सजून बसलेला आहे आणी दरदिवशी हजारो लोकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे..

हे प्रवेश द्वार , एरवी फुकट प्रवेश असला तरी या काळात ३०० रुपये एव्हढी प्रवेश शुल्क आकारण्यात येते.. पण आतला मेंटेंनंस पाहता हा दर वाजवीपेक्षा जास्त वाटत नाही..

प्रचि १

प्रचि२

प्रचि३

प्रचि४

ईअर ऑफ स्नेक असलं तरी ड्रॅगन पाहिजेच..

प्रचि ५

प्रचि ६
वरवर जाणार्‍या पायर्‍या.. इथे बहुतेक करून म्हातारे आणी लहान मुलं दिसत होती..
अवांतर.. या शहराच्या जुन्या भागांत ९,९ मजली इमारतीतून देखील लिफ्ट ची सोय नसते. त्यामुळे या लोकांना या पायर्‍या म्हंजे किस झाड की पत्ती वाटत असाव्या..

प्रचि७

प्रचि८

प्रचि९

प्रचि१०

प्रचि ११

प्रचि १२


प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

वर वर चढून गेल्यावर एका मोकळ्या आवारात , बाजूला लहानश्या टेपरेकॉर्डरवर मंजुळ संगीताच्या तालावर शांत पणे 'तायची'( The gentle
exercises practiced for both mind and body benefits.)
करत असलेल्या या दोघी भेटल्या..

प्रचि १६

प्रचि १७


प्रचि १८

प्रचि १९

क्रमशः Happy

http://www.maayboli.com/node/40890 - भाग १

http://www.maayboli.com/node/40893 -भाग २

http://www.maayboli.com/node/40896 - भाग ३

http://www.maayboli.com/node/40953 -भाग ४

http://www.maayboli.com/node/41012 - भाग ५ (अंतिम)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मस्त! Happy

ते गेट, ड्रॅगन वगैरे वगैरे कापडाचे बनवले आहेत का?

शहराच्या मध्यात अशी बाग म्हणजे खासच की Happy

मस्त फोटो
.
.
यावर्षी........"साप" आहे ना वर्ष प्राणी ?

शहराच्या मध्यात अशी बाग म्हणजे खासच की स्मित >>>> +१००...

वर्षु - फारच सुंदर फोटो व छान माहिती ......

मस्त

मस्तच गं फोटोज....
याच नववर्षानिमित्त जवळच्या चायनीज दुकानाने पुधच्या खरेदीसाठी १०% डिस्काउंट कुपन दिलंय (लब्बाड Wink )

Happy

मस्त वाटले फोटो. माझ्या मित्र मण्डळीना पाठवले तर हरकत नाही ना ? म्हणजे copy right वगैरे काही ? माझे मित्र मायबोलीवर नाहीत पण त्याना कळाव अस वाटल म्हणून विचारतोय.

श्रीकांत जोशी.. यू आर मोस्ट वेलकम.. कॉपी राईट वगैरे काही भानगडी नाहीत.. प्लीज फील फ्री टू शेअर .. इट्स ओके.. Happy

Pages