स्फुट शेर (प्रासंगिक)

Submitted by सतीश देवपूरकर on 7 February, 2013 - 10:17

स्फुट शेर (प्रासंगिक)
खूळ घ्यायचेच खूळ लागले मला!
चौकटीत राहणे पसंत ना मला!!
..............................................................
तोब-यामुळेच तोंड चरबटे किती!
खळखळून एक छान टाक चूळ तू!!
...........................................
उंच हा बकूळ, ठेंगणाच मोगरा!
कोणतेच फूल माझिया न जोगते !!
..........................................................
तडकशील तूच अन् कळेल हे तुला.....
काच मी दिसावया तरी अभेद्य मी!
............................................................
दगड एक मार अन् दिसेल मी कशी....
हे तुला कळेल की, किती गढूळ मी!
.............................................................
चौकटीतली नव्हे तुम्हासमान मी;
कोणत्या कुळात मी, मला न माहिती!
..............................................................
कागदी असेल पण, त्रिशूळ घेतला!
मारते कुणाकुणास ते तरी पहा!!
.............................................................
व्योम व्यापणार मीच, चंग बांधला!
शायरीतली जरी असेल धूळ मी!!
..............................................................
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे शेर हझलेसाठी लिहिले आहेत असे गृहित धरून...>>>>>

आम्ही कै गृहित्बिहित धरलेले नाही कारण हे का लिहिलेत ते आम्हाला माहीत आहेच
असो

स्फूट शेर हा नवा प्रकार समजला धन्स टू देवसर
बागेश्रीला सांगा कुणीतरी तिला फार आनंद होईल शेरही स्फूट असतात म्हटल्यावर Wink

स्फूट नव्हे स्फुट शेर म्हणजे सुटे शेर!
ज्यांच्यात वृत्त काफिये रदीफ कशाचेच बंधन नसते!
अर्थात एका शेरातील दोन्ही मिस-यांचे वृत्त मात्र सारखेच असायला हवे व प्रत्येक शेर एक स्वयंपूर्ण कविता असायलाच हवी! शेर मतल्या सारखे असतील वा नसतीलही!
अशा लिखाणाने आपणांस शेर लिहिण्याचा सराव होतो व कोणत्याही आशयाचा, खयालाचा आपण शेर करायला हळूहळू शिकत जातो!........वै.मत!