थांबण्याजोगे कुठेही दार नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 5 February, 2013 - 22:20

गझल
थांबण्याजोगे कुठेही दार नाही!
ऐकण्याजोगा कुठे झंकार नाही!!

जोवरी होकार ती देणार नाही,
पान झाडाचे कुठे हलणार नाही!

एकही पडला चरा ना काळजाला;
पाहिजे तितकी सु-याला धार नाही!

आजही झेपावती लाटा किनारी;
ओढ ती पण कालची अनिवार नाही!

हे कसे आले जिणे वाट्यास माझ्या?
ज्यात झाली जीत नाही, हार नाही!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या रानफुलेतील एक रचना काहीही बदल न करता जशी होती तशी इथे पोस्टली!
गझलेची बाराखडी गिरवताना लिहिलेली रचना!