'निष्पर्ण' (कविता-मुक्तछंद)

Submitted by सुशांत खुरसाले on 5 February, 2013 - 02:36

प्रेरणांशी प्रतारणा केल्याच्या काळोखात चिंब
भिजलेला मनाचा काजळडोह........
त्या डोहावर सुवासिक हास्यांच्या गुलामगिरीने
निर्मिलेले चंदनी सांत्वनाचे नागमोडी पूल......

झुगारुन द्यायचं आता हे सारं..!

आणि तटस्थ राहायचं-
अंधाराच्या पार्श्वभूमीवर विजेच्या कल्लोळाने
निष्पर्ण झालेल्या वॄक्षासारखं .....
त्याला कसा होत नाही पाखरांचा मोह अन्
कसं खुणावत नाही -वसंताचं संगीत ....
सप्तरंगी इंद्रधनुंचे उखाने नसतील आले
त्याच्या वाटेला किंवा विझून गेल्या
असतील पालवीच्या प्रसववेदना.....

..... तरीही तो त्याच्या ठायी स्वयंभूच ....
एका चित्रकाराची दिव्य प्रेरणा बनून....!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users