रोमानियन स्त्रीचे जागतिक स्तरावरील स्थान

Submitted by उज्ज्वला अन्नछत्रे on 4 February, 2013 - 13:49

१९७६ मध्ये पहिल्यांदाच घरातल्या tv वरून मोंट्रियल येथील ऑलिम्पिक खेळांचं प्रसारण पाहताना अंगावर रोमांच आले होते !
आणि त्यातही ‘अनईव्हन बार्स’चा डोळ्याचं पारणं फेडणारा performance-एका छोट्या –केवळ १४ वर्षांच्या मुलीचा !
जजेसनी तिला ‘परफेक्ट टेन’ दिले होते !
नव्या ऑलिम्पिक- जिम्नॅस्टिक्सच्या इतिहासात हे पहिल्यांदाच झालं होतं ! पूर्वापार ऑलिम्पिक स्कोअर-बोर्ड बनवणार्या ‘ओमेगा एस ए ‘ नेया खेळांआधी जेव्हा विचारलं कि ‘४ डीजीटस लागतील का स्कोअर-बोर्ड वर ?’ तेव्हा त्याला उत्तर मिळालं होतं , ‘परफेक्ट टेन’ मिळण कधीही शक्य नाही ! छोट्याशा ‘नादिया कोमानिच’ चे मार्क त्यामुळे १०.०० असे दिसण्या ऐ वजी जगाला 1.०० असे दिसले! प्रेक्षकांना काही कळेचना पण लगेच लक्षात येऊन त्यांनी सर्वांनी उभे राहून छोट्या नादियाला मानवंदना दिली .
ही नादिया कोमानिच ‘ऑलिम्पिक ऑल अराउंड’ टायटल जिंकणारी पहिली रोमनिअन होती आणि आत्तापर्यंतची जिम्नॅस्टिक्स ची सगळ्यात लहान ‘ऑल अराउंड’ !
टेलीविजन प्रोग्राम मध्ये तिच्या performance च्या स्लो मोशन बरोबर ‘कॉटन ड्रीम’ या ‘ब्लेस द बीस्टस एन्ड चिल्ड्रन’ या सिनेमातील गाण्याचा instrumental piece वाजवला गेला . त्यानंतर या गाण्याचे नाव बदलून ‘नादियाज थीम” असे ठेवले गेले ! ही १९७६ ची ‘बिबिसी स्पोर्ट पर्सनालिटी ऑफ द इयर’ , असोसिएटेड प्रेस ची ‘athlete of the year’ , U P I ‘female athlete of the year’ जेव्हा रोमनियात परतली , तेव्हा ‘हिरो ऑफ सोशालिस्त लेबर’ म्हणून स्वतःच्या देशात गौरवली गेली . यावेळी रोमानिया चे अध्यक्ष होते ‘निकोल चाऊशेस्कू’ . तिथून पुढे ऑलिम्पिक गेम्स पाहताना दरवेळी रोमानिया ची खेळाडू आली , कि आमची उत्कंठा वाढत असे आणि रोमानियन स्त्री खेळाडूंनी आमची कधीही निराशा केली नाही !
रोमनियात अरुणच्या नोकरीच्या निमित्ताने प्रत्यक्ष जाऊन रहाण्याची संधी मिळाली , तेव्हा ह्या आधीच्या ‘सुपरिचित रोमानिया’ला जवळून पाहण्याची संधी मिळाली . तेव्हा गेल्या १००/१५० वर्षातील रोमानियाचा इतिहास आणि रोमनिअन स्त्रीचे जागतिक स्तरावरील स्थान जाणून घेण्याचा मोह होणे स्वाभाविकच होते.
बुखारेस्त राजधानिच शहर असलेलं रोमानिया युरोप मधील दक्षिणी पूर्वेकडील छोटेसे राष्ट्र .रोमानियाच्या एका बाजूला black sea आहे . पशिमेला हंगेरी आणि सर्बिया , उत्तरपूर्व आणि पूर्वेकडे युक्रेन आणि मोल्दोवा ही राष्ट्रे आणि दक्षिणेकडे बल्गेरिया . तेल, natural gas, लोखंड, कोळसा , तांबं आणि bauxite या नैसर्गिक संपत्तीने समृद्ध रोमानिया २० व्या शतकाच्या सुरुवातीपासून पहिल्या जागतिक महायुद्धापर्यन्त खूप श्रीमंत राष्ट्र म्हणून ओळखले जात होते . रोमानिया हे युरोप मधील पहिले राष्ट्र रस्त्यांवर लाईट्स असलेलं ! रोमानिया च्या आर्थिक प्रगतीचा आलेख चढता होता.रोमानिया त्या काळात छोटे paris म्हणून ओळखले जात असे . भौगोलिक रित्या अगदी मध्यावर असल्यामुळे दोन्हीही जागतिक महायुद्धांमध्ये रोमानिअला इच्छा नसताना सहभागी व्हावे लागले . रोमानियाचा इतिहास खडतर आहे . सुपीक जमीन , black sea , danube नदी यांमुळे बऱ्याच राष्ट्रांना रोमानिया सर करण्याची इच्छा होती . त्यामुळे या देशावर सतत युद्धे लादली गेली. जर्मन्स व रशियन्सनी महायुद्धांच्या काळात हा देश व्यापला .दुसर्या महायुद्धानंतर या राष्ट्रावर कम्युनिझम लादला गेला . ‘बोल्शेबिक सिस्टिम’ राबवली गेली.
पूर्वापार परंपरेनुसार स्त्रियांनी घरसंसार सांभाळणे ,मुलांना वाढवणे आणि पुरुषांनी बाहेर काम करून पैसे मिळवणे असे श्रमविभाजन होते . स्त्रीला घरात संरक्षण आणि आदर होता . जाणीवपूर्वक आणि अजाणता स्त्री पुरुष सुख दुक्खाचे समान भागीदार होते .
श्रीमंती जाऊन देशाला विपन्नावस्थेला तोंड देण्याची वेळ यावी इतपत परिस्थिती बदलली , ती दुसर्या महायुद्धाच्या व नंतरच्या काळात. १९४७ मध्ये कम्युनिस्टiनी किंग मिशेल –पहिला याला रोमानिया सोडून पळून जायला भाग पाडले . रोमानिया स्वतंत्र गणराज्य म्हणून घोषित केले गेले. आणि रशियाच्या मिलिटरी आणि आर्थिक सत्तेखाली राहिले, ते १९५० पर्यंत . या काळात रशियाने रोमानियाच्या राष्ट्रीय संपत्तीचा ओघ Moscow कडे वळवला . १९५८ नंतर रोमानियाचा नवा अध्यक्ष होता निकोल चाउशेस्कू .
देशातील या प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत असताना रोमनिअन स्त्री खचून न जाता जागतिक पातळीवर पाय रोवून उभी होती रोमानियाचा झेंडा फडकवत.१९३७ ते १९६० पर्यंतची कारकीर्द झळाळत ठेवली होती ‘अन्जेलिका रोझिनू’ या रोमनिअन टेबल टेनिस प्लेयर नी ! टेबल टेनिस खेळाच्या इतिहासात सर्वात यशस्वी टेबल टेनिस महिला खेळाडू म्हणून अन्जेलिका चं नाव घेतलं जातं world championship मध्ये १७ गोल्ड मेडल्स मिळवण्याचा पराक्रम करणाऱ्या रोझीनूने इतर १२ मेडल्स (सिल्वर व ब्राँझ )मिळवली .युरोपिअन championship मध्ये ६ मेडल्स तिने रोमानिया ला मिळवून दिली. निकोल चाउशेस्कू रोमानियाचा अध्यक्ष असताना –ज्यावेळी रोमानियात कम्युनिझम राबवला जात होता , त्यावेळी पहिल्यांदाच स्त्रियांना घराबाहेर पडून काम करण्याची सक्ती झाली . आणि स्त्री – पुरुष समानता रोमनिअन स्त्रीवर लादली गेली . एका INTERNATIONAL बँकेची manager फ्लोरेन्सा म्हणते ,”पोलिसांना जर सुगावा लागला कि एखादी स्त्री नोकरी न करता घरात बसून आहे , तर ते लगेच घरी येऊन कागद पत्रे मागत . नोकरीची कागदपत्रे न मिळाल्यास पकडून तुरुंगात डांबले जाई ! परंतु नोकरी देताना तिच्या शेक्षणिक व इतर पात्रतेची दाखल न घेताच सरसकट ‘कामगार वर्ग’ मानून काम दिले जाई.फ्रेंच व इंग्रजी भाषेची प्रोफेसर असलेली तमारा म्हणते,”१९७५ -७७ पर्यंत तरीही परिस्थिती इतकी वाईट नव्हती .लोकांकडे पैसे जास्त नव्हते , कारण पगार अतिशय कमी .अन्न-धान्य तरीही मिळत असे .परंतु बाहेरच्या जगात काय चालले आहे याची सुतराम कल्पनाही आम्हाला नसे .national tv हे एकच चानेल संध्याकाळी ७ते९ असे दोन तास पाहायला मिळे. त्यावर दाखवले जाणारे कार्यक्रम व बातम्या sensor केलेल्या असत. सरकारी सूचना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे साधन म्हणून मुख्यत्वे tv चा वापर होई . छोट्या मुलांसाठी कार्टून्स दाखवली जात. देशाबाहेर जाण्याची सामान्य नागरिकांना परवानगी नसे. व जे ०.५%लोक परदेशी जाऊ शकत, त्यांनाही फक्त कम्युनिस्ट देशातच जाण्याची परवानगी असे. पण या काळातही जगासमोर मन उंचावून रोमनिअन स्त्री उभी होतीच !
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती. Happy

manager फ्लोरेन्सा, प्रोफेसर तमारा >>> या स्त्रिया तुमच्या माहितीतल्या / स्नेही आहेत का? त्यांच्याशी तुम्ही या विषयावर चर्चा केलीत का?

सुरेख माहिती... एक विनंती.. जरा सवीस्तर लिहा या देशा बद्दल... म्हणजे इथली सामाजिक, आर्थिक, नैसर्गीक परिस्थीती... तुम्हाला आलेले अनुभव... या वेगळ्या देशातल्या वेगळ्या चालीरीती, इथले सण, खाणे पिणे... तुम्ही त्याच्याशी कसे जुळवलेत....

आर्थात भोचक पणा केल्या बद्दल माफ करा!!!! पण माबो वर अश्या प्रकारच्या लिखाणाला नेहेमीच नावाजले जाते...

हा लेख लिहिण्यापूर्वी मी रोमानियाचा इतिहास अभ्यासला वेगवेगळ्या पदांवर काम करणार्या स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या आणि या सार्याजणींशी माझी मैत्री पण झाली. मी सध्या रोमानियन कवींचा अभ्यास करून त्यांच्या कवितांचा मराठीत अनुवाद करत आहे. पण रोमानियन येत नसल्याने तमाराची मदत घेते आहे.

ललिता प्रीति, मोहन की मीरा, धन्यवाद. रोमानियाबद्दल भरपूर लिहायचं ठरवलं आहे. आणि तुमच्या सूचनांचं मनःपूर्वक स्वागत !

मी सध्या रोमानियन कवींचा अभ्यास करून त्यांच्या कवितांचा मराठीत अनुवाद करत आहे. पण रोमानियन येत नसल्याने तमाराची मदत घेते आहे.

>>> अरे वा! हे भारीच आहे! रोमानियाच्या वर्णनाच्या ओघात तुमच्या चर्चा-संवादांच्या अनुषंगाने लिहिलेलं काही असेल, तर ते ही वाचायला आवडेल. Happy