प्रयाग राज कुंभ मेळा :भारताचा अक्षय गौरव.-डॉक .संजय होनकळसे

Submitted by शिवंजय on 4 February, 2013 - 08:43


प्रयाग राज कुंभ मेळा :भारताचा अक्षय गौरव.-डॉक .संजय होनकळसे
drsanjayhonkalse@gmail.com

भारत भूमीत क्वचितच असं कुणी असेल कि ज्याने कुभ मेळ्य़ा बद्दल ऐकल नसेल.साऱ्या जगात कुंभ मेळा एक आश्चर्य जनक उत्सव आहे, ज्यात भारतीय समाज,संस्कृती,धर्म ,वैविध्य संपूर्णपणे समन्वित असत,अस मानल जात. या व्यतिरिक्त कुंभ मेळा आज प्रचंड आर्थिक उलाढालीच, अभ्यासाच ,संशोधनाच साधन व व्यवस्थापनाचा उत्कृष्ट उदाहरण आहे. मी स्वतः माझ्या व्यवस्थापनशास्त्राच्या प्रत्येक वर्गात पंढरीचीवारी, कुंभ मेळा यावर व्यवस्थापन, जागतिक वित्तीय उलाढालीच माध्यम,व Mega/Macro Managementचा उत्कृष्ट नमूना यावर प्रोजेक्ट घेत असतो.कुंभ मेळा आज जगातील प्रचंड आर्थिक उलाढाल असलेल आश्चर्य जनक भारतीय सांस्कृतीच पारंपारिक संम्मेलन आहे , आणि म्हणूनच भारताचा अक्षय गौरव आहे.खरतर अध्यात्मिकांक (Spiritual Quotient )जर स्वीकारला व विकसित केला तर व्यक्तिमत्व विकास व व्यवस्थापन उत्कृष्टपणे साधला जाऊ शकतो या ठाम मताचा मी आहे व त्यानुसार मी त्यावर एक पुस्तक पण लिहिले आहे जे अमेरिकेत प्रकाशित झले आहे MANAGEMENT BY SPIRITUAL QUOTIENT :THE POWER OF FAITH .PUBLISH AMERICA PUBLICATION )

हे अस जागतिक दृष्ट्या आश्चर्य असलेल मेळा , संमेलन भरण्याचे स्थळ ना कुण्या दिग्विजयी राजाची वा शासकीय राजधानी असते ना एखादे वाणिज्य प्रधान ऐश्वर्य नगर असते ते असते भारतातील प्रमुख,पवित्र तीर्थ क्षेत्र होत.तसेच हे संमेलन भरण्याचा समय राजकीय वा सामाजिक आधारावर निर्धारित नसतो तर शास्त्रोक्त पद्धतीनुसार खगोलीय ग्रह,राशी, नक्षत्र,यांच्या विशिष्ट संयोगाधरीत असते.याचा उद्देश भौक्तीक,अध्यात्मिक प्रगती ,व शाश्वत जगत कल्याण साध्य करणे हे आहे. भारतवासी किती धार्मिक व भावूक आहेत याच सर्वोत्तम प्रमाण कुंभ मेळा आहे.जगात कुठेही अशा प्रकारचा व इतका भव्य दिव्य मेळा नाही. याच्या भव्यतेची कल्पनाही इतर राष्ट्र करू शकत नाही.एवढेच नव्हे तर हा मेळावा भरवण्यात ना कुणी उद्योजक,ना आव्हाहन कर्ता, ना संवाद दाता ,ना सभापती ना सभा,ना संचालक वा संचालन,कुठल्याही आमंत्रणवा निमंत्रणाशिवाय आज करोडो भाविक,भारतीय , अनिवासी भारतीय,व परदेशी कुंभ मेळ्याला अत्यंत श्रद्धापूर्वक हजर राहतात व धर्मामृताचा आस्वाद घेतात.या मुळे महाकुंभाला आता " जगत कुंभाचे" (GLOBAL VILLAGE चे) स्वरूप प्राप्त झाले आहे .:"जेथे कैक जण विविध भाषा, संस्कृती,धर्म ,विविध विचारधारा असलेले भाविक एकत्र येतात, कैक जण तर कल्पवास (मेळाव्याच्या ठिकाणी कमीत कमी चाळीस दिवस निवास,साधना, जप तप ,अनुष्ठान करणे).या शतकात तर अनेक परदेशी साधक अत्यंत भाऊक पणे व श्रद्धापूर्वक वर्दी लावतात याचा प्रस्तुत लेखक साक्षीदार आहे.या सर्वामुळे एकजूटतेचा अभाव असलेली"dying race ""म्हणून भारतास हिंणवनाऱ्याना तोंडात बॉट घालण्यास भाग पाडतात.

कुंभ मेळ्याचा उल्लेख गरुड पुराण( I -२४०,)रामायण (III ३४-३७),महाभारत( I -२५)ई. मध्ये आढळतो . पौराणिक कथेनुसार एकदा दुर्वास ऋषींनी इंद्राला अमरावतीत (स्वर्गाच्या राजधानीत)भेट देऊन त्याला वैजयंतीमाळ दिली पण त्यास महत्व न देत ती माळ इंद्राने ऐरावत या आपल्या हत्तीच्या गळ्यात घातली ती त्या ऐरावताच्या पायाखाली तुडवली गेली .हे समजल्यावर दुर्वास कोपित झाले व त्यांच्या शापामुळे इंद्राला लक्ष्मीची अवकृपा होऊन दारिद्र्य आले तेंवा इंद्राने महलक्षमी अष्टक रचून लक्ष्मीची कृपा प्राप्त केली व त्यामुळे पुनर्वैभव प्राप्तीसाठी हिमालयाच्या उत्तर क्षीरसागरात सागर मंथनाची तयारी झाली . त्यानुसार स्वयं विष्णूने कूर्मरूप धारण करून मंदार पर्वताला पाठीवर घेऊन, वासुकीरूपी दंडाने मंथन /चर्वण करून पुष्पक, पारिजात, कौस्तुभ, विष, व अमृतकुंभ घेऊन धन्वंतरी प्रकट झाले. त्या अमृतावर हक्क दाखवण्यासाठी सूर असुरांत द्वंद निर्माण झाले ते बारा दिवस ,देवांचे बारा दिवस म्हणजे पृथ्वीवरील बारा वर्ष,चालले. त्यादरम्यान इंद्रपुत्र जयंत तो अमृत कुंभ घेऊन पळाला त्या दरम्यान त्यातील अमृत काही प्रमाणात चार दिवसात चार ठिकाणी पृथ्वीवर सांडले त्या चार ठिकाणी तेंव्हापासून कुम्भ पर्व साजरे केले जाते. ती चार ठिकाणे म्हणजे १- हरिद्वार, २- प्रयागराज , ३-उज्जैन, व ४-नासिक.देवांचे बारा दिवस म्हणजे मानव्सामाजाचे बारा वर्ष , म्हणून दर बारा वर्षांनी त्या त्या ठिकाणी कुंभ भरतो सूर्य, चंद्र, व गुरु अमृतकुंभाचे रक्षण करण्याचे कार्य करीत होते म्हणून हे ग्रह जेंव्हा विशिष्ट राशींमध्ये संयोग करतात तेंव्हा ,बारा वर्षांनी, कुंभ मेळा भरतो.
असा संयोग यावर्षी तीर्थराज प्रयाग येथे होत आहे व येथील त्रिवेणी संगमात हा मेळा जानेवारी १४ ते मार्च १० २०१३ या ५५ दिवस भरत आहे. कुंभ पर्व पौराणिक काळापासून जरी साजरे केले जात असले तरी १० व्या शतकात आदि शंकराचार्य यांनी याचे संघटन केले व मेळ्यास संघटनात्मक स्वरूप प्राप्त करून दिले .त्यांनी साधूंचे संघटन केले व कुंभ मेळ्यास प्रतिष्ठा व संघटनात्मक रूप दिले व पुढे हे संमेलन परिपुष्ट होत जाऊन त्याला आजचे महत्व व कीर्ती प्राप्त होउन त्याने विश्वस्वरूप प्राप्त केले आहे .म्हणून या कुंभ पर्वत हजोरो साधू संत यांना दीक्षा दिली जाते, भ्रमाचारी साधू यांना नागा दीक्षा दिली जाते

प्रयाग येथे त्रिवेणी संगमामुळे येथील कुंभ पुण्यतर मानला आहे माघ महिन्यात चंद्र सूर्य मकर राशीत राशीत असता सूर्य,चंद्र , गुरु यांच्या इलेक्ट्रो-मग्नेटिक तरांगामुळे त्रिवेणीतील पाणी charged होऊन त्याचे फायदे मिळतात,ठराविक खगोलीय परीस्तीतीत (astronomical situations मुळे )असे electro -magnetic तरंग तयार होतात हे आजच्या शास्त्रीय संशोधनात सिद्ध झाले आहे व त्याच्या परिणामांचा अभ्यास पण होत आहे हे बुद्धीजीवी बुद्धिवादी प्रभुती लक्षात घेतीलच. त्यातूनही याखागोलीय संयोगात मकर सूर्य संक्रमण, मौनी अमावस्या, वसंत पंचमी, व महाशिवरात्र या दिवसांत खगोलीय वातावरण अधिकच भरलेले असते असते त्यावेळी पूर्वापार राजे ,महाराजे स्नान करीत असत त्याला शाही स्नान म्हणतात आजच्या युगात राजेशाही जरी लुप्त झाली असली तर्री यादिवासातील स्नानास आजही शाही सणांच म्हणतात.आज या स्नानाचा मानं साधू संत ,सिद्ध महात्मे घेतात .मुहूर्ताच्या वेळी सर्वसाधूंचे त्यांच्या आखाड्यानुसार मिरवणूक काढून वाजत गाजत स्नान होते (आदि शंकराचार्य यांनी सर्व साधू संत
यांचे विविध आखाड्यान मध्ये विभाजन केले,असे आज जवळ जवळ १४ आखाडे आहेत)तसेच संत, महात्मे , यति, किन्नर,सिद्ध, महात्मे या पर्वत एकत्र येतात .जग पर्सिद्ध सिद्ध महावतार बाबाजी( जे परमहंस योगानंद यांच्या "Autobiography of yogi :(मराठीत योगी कथामृत) या जग प्रसिद्ध पुस्तक्द्वारे जगापुढे आले ,ज्यांनी पंतजल योगाचे,आजचे प्रचलित स्वरुप याचे,पुनर रोपण केले,(REF:"महावतार बाबाजी":डॉक संजय होनकळसे:गुरुतत्व प्रकाशन,कोल्हापूर.)यांनी युक्तेश्वर(परमहंस योगानंद यांचे गुरु ) यांना याच कुंभ मेळ्याच्या १८९१ च्या पर्वात दर्शन व उपदेश केला . "तीर्थे कुर्वन्ति साधक: " . आज कित्येक लोकांना येथे गलिच्छ पण जाणवते तसाच काहीसे मत युक्त्श्वारांचे होते त्या बद्दलचे संभाषण व बाबाजींचा उपदेश वाचण्यासारखा आहे जिज्ञासूंनी तो वरील पुस्तकात जरूर वाचवा .प्रस्तुत लेखकांस हरिद्वार,प्रयाग, नासिक व उज्जैन येथ असे शाही स्नान घेण्याचे भाग्य लाभले आहे
आज या पर्वामुळे व भारतातील संत महात्मे, सिध्द गुरु,अवतार या मुले भारत आज देवभूमी, पुण्यभूमी epitome of world म्हणून आधात्मिक जगतात मान मिळवून आहे. quantum physics मुळे आज अध्यात्म व शास्त्र यातील दरी कमी होऊ पाहत आहे , देव कण (god particles ) यांचे अस्तित्व आज जग मान्य करीत आहे.अश्या पर्वत, अग्निहोत्र पद्धतीने केलेल्या सोमयाग,वाजपेय यज्ञात असे देवकण निर्माण होत असतात. भारतातील महाराष्ट्रातील संत जयंत आठवले यांच्या शरीरातून देवकण प्रसूत झाले आहेत जग व शास्त्रज्ञ आज ते स्वीकारीत आहेत पहा http://www.spiritualresearchfoundation.org/articles/id/spiritualresearch... या विषयावर डॉक. दुर्गेश सामंत व श्रीमती अंजली गाडगीळ यांनी पुणे येथील MIT येथ भरलेल्या ‘Indian Aerobiological Society’ १७ व्या अधिवेशनात संशोधन पत्रिका सादर केली आहे विशाज्ञानाद्धाराच साधन होत आहे. व भारतास मार्ग प्रदीपक बनवीत आहे.विषयांतराचे धारिष्ट्य करण्याचे कारण हेच कि देवत्वाची संकल्पना आता SCIENCE हि मान्य करीत आहे. science हि देवत्वाचं अस्तिव आजही स्वीकारू शकत नसले तरी नाकारू शकत नाहित हे बुद्धिवादी पण बुद्धिमान व्यक्तींनी लक्षात घाव्ये.याचाही पाया भारतातील बोस यांनी गेली शतकाच्या सुरुवातीला घातला हेही महत्वाचे.
( Bose theory of God Particles )
या सर्वामुळे भारत आज मानव जातीच्या विविध समस्यांचे समाधान स्थान बनत आहे.व नित्य आत्मा व अनित्य शरीर या देव दानव रुपी संग्रामातून, आत्म मंथनातून विवेक जागृत करणार अस हे कुंभ पर्व आत्म ज्ञान उद्धाराच साधन होत आहे. व भारतास मार्ग प्रदीपक बनत आहे
dr sanjay honkalse
९९८७७९४४८४

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users