.....................

Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 03:31

........................
........................
........................
गझल मला काही जमत नाहीये बहुतेक, मग सोडून च देते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीवर कमलेश पाटिल नावाचे एक गझलकार आहेत त्यांची आठवण आली

तेही असेच स्त्रीमनाने रचना करतात आपण पुरुषमनाने करता वाटते (नावावरून तर आपण स्त्री आहात असे वाट्ते
असो

अवांतर : मूळ मुद्दा हा की ही गझल नाहीच आहे मुळी !(थोड्याफार बदलांनी ही गझल ठरू शकते)

मी स्त्रीच आहे, सर. पण मला स्त्री मनाने कविता नाही जमत फारश्या. पण प्रयत्न करेन. मी गझल हा प्रकार पहिल्यांदाच हाताळला. हि गझल काही बदल केल्यास होईल, असे सागितले आहे. तर बदल सुचवावेत.

बदलाची गरज आहे इतकेच सुचवा असे मला एकदा सांगीतले गेले तेव्हापासून मी फक्त गरज आहे असे सुचवतो

नेमके बदल सुचवण्याचे पेटंट प्रा. सतीश देवपूरकर साहेब(आम्हा सर्वांचे देवसर) यांनी मिळवले आहे त्याना विचारणा करावी

धन्यवाद !!

नमस्कार,
प्रयत्न चांगला आहे. र्‍हस्व दीर्घाचे पहा जरा...

तुम्ही स्त्री हा शब्द जसा दीर्घ लिहिता, तसाच "ही" असा शब्द लिहा. "हि" नको.

र्‍हस्व दीर्घ काही ठिकाणी बदललेले आहेत. याशिवाय, हळूहळू कविता व गझल हा काव्यप्रकार या दोहोतील भावात्मक फरक अभ्यासण्यासाठी काही चांगल्या गझलांचे वाचन करा, किंवा गुलाम अली, पंकज उधास यांनी गायलेल्या काही बहुश्रुत गझला ऐकून त्यातील आशयगुण कसा असावा याची जाणीव करून घ्या.

(टीप - अनेकदा, तंत्र पाळलेले असते, अवगत असते, पण रचना एखाद्या कवितेसारखी, गीतासारखी होऊन बसते. गझलेचा आशयगुण अलगदपणे कॅप्चर करण्यासाठी गझलेशी थोडा - तंत्रापलीकडे जाऊन - अधिक जवळचा परिचय व्हावा लागतो).

तुम्ही एक ओरिजिनल आय डी आहात असे गृहीत धरून हे लिहिले.

शुभेच्छा!

मी गझल एका उत्तम जाणकाराकडून तपासून घेतली असून, ह्याला गझलच म्हणतात असे त्यांचे ठाम मत आहे. त्यामुळे मी यात काहीही बदल करू इच्छित नाही.

Madhura Kulkarni | 3 February, 2013 - 22:38 नवीन
मी गझल एका उत्तम जाणकाराकडून तपासून घेतली असून, ह्याला गझलच म्हणतात असे त्यांचे ठाम मत आहे. त्यामुळे मी यात काहीही बदल करू इच्छित नाही.<<<

तुमच्या त्या उत्तम गझल जाणकारांनी हा मतला नीट वाचला का तुम्ही लिहिलेला?

तिच्या विना घर सुनेच सारे, जसे सुने राधेविण गोकु
वृंदावन हे आसुसलेले, सूर वेणूचे झाले व्याकू

दोन्हीत कू / कु हे अक्षर आहे. मुळात मतल्यात त्यामुळे अलामत भंगली आहे. शिवाय त्यानंतर ओंजळ, दरवळ , मंजुळ, सोज्वळ, दरवळ असे कवाफी तुम्ही घेतलेले आहेत. हे त्यांनी पाहिले का? आधी कू आणि कु यात र्‍हस्व दीर्घाचा फरक पडणे हाच प्रॉब्लेम आहे, पण निदान 'क' हे अक्षर मान्य व प्रस्थापित झाल्यानंतर हे इतर कवाफी चालणार नाहीत.

तुम्ही बदल करू इच्छिता की नाही याने काही फरक पडत नाही. याला बाकी कोणी गझल म्हणणार नाही. मी आधी लिहिताना तंत्राबाबत फार काही बोललो नव्हतो, फक्त आशयाबाबत बोललो होतो. पण तुम्ही आणि तुमचे ते उत्तम गझल जाणकार अजून गझलतंत्राबाबतच पूर्णपणे गोंधळलेले दिसत आहात. तेव्हा तुमच्या गझलेवर ती एक तंत्रशुद्ध गझल असल्याशिवाय यापुढे प्रतिसाद देण्यात मला स्वारस्य नाही.

-'बेफिकीर'!

मधुराताई....

>>>>
मी गझल एका उत्तम जाणकाराकडून तपासून घेतली असून, ह्याला गझलच म्हणतात असे त्यांचे ठाम मत आहे.
<<<<<

तो उत्तम जाणकार असेलही, पण तो गझलेचा उत्तम जाणकार आहे का हेही तपासावे लागेल.

मतल्यातील ह्र्स्व कु आणि इतर शेरातील अ हे सवलत म्हणून चालू शकते. म्हणूनच मी तुम्हाला ह्रस्व दीर्घ बद्दल सांगितले. बाकी काय, निर्णय तुमचाच आहे.

जर तुम्ही निवडलेल्या जाणकाराचे हीच गझल आहे आणि यात सुधारणांची आवश्यकता नाही असे म्हणणे असेल तर तुम्ही गझलेच्या शेवटी...
"(हि माझी पहिलीच गझल आहे. सुधारणांचे स्वागत."
असे लिहिण्याची आवश्यकता नव्हती....

असो. निर्णय तुमचा...!

उत्तम जाणकारांना एखाद्या अत्युत्तम जाणकाराच्या मार्गदर्शनाची गरज असावी, असे वाटते.

मधुरा जी,

तुमचे 'उत्तम जाणकार' वाले विधान खूप विचित्र वाटते... त्यातून असा अर्थ प्रतीत झाला की, 'मी लिहिले ते बरोबरच आहे.. मला तुमच्या सल्ल्यांची आवश्यकता नाही.' हे पटले नाही म्हणून मीही नाक खुपसले.