मुखवट्यांना चेहरे सरसावले होते !.....(खयाली तरही)

Submitted by सुप्रिया जाधव. on 2 February, 2013 - 14:22

चंद्रता-यांना उरी कवटाळले होते
टाळले त्यांनाच जे-जे आपले होते !

माणसे निर्व्याज्य सारी लोपली कोठे ?
मुखवट्यांना चेहरे सरसावले होते !

धावले वेळेवरी शेजार-पाजारी...
औरसे खांदेकरी ना जाहले होते

फुलवला असता धरेवर स्वर्ग दोघांनी...
मार्गतर काट्यातुनी मी काढले होते

संकटे देती पुरावे देव नसल्याचे
तारण्याला कोण नक्की धावले होते ?

' मृगजळापाठी असे धावू नये वेडे ! '
लाखदा माझे मला खडसावले होते

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संकटे देती पुरावे देव नसल्याचे
तारण्याला कोण नक्की धावले होते ?<<< सुंदर शेर (अर्थात, खयाली तरहीच्या आशयानुसार नेमका नसला तरी)

' मृगजळापाठी असे धावू नये वेडे ! '
लाखदा माझे मला खडसावले होते <<< छान शेर

खयाली तरहीतील सहभागाबद्दल धन्यवाद व अभिनंदन! आशयाची अचूकता मात्र तितकीशी आलेली नाही. सरसावले या शब्दाचा वापर बहुधा सरावले असा केल्यासारखे वाटत आहे. अर्थात, अजून मुदत असल्याने अचूक शेर रचायचे असल्यास रचू शकताच. तसेही काय, मुदत ही आपण केवळ गंमत म्हणूनच ठेवली आहे, केव्हाही कोणताही शेर झाला तरी काय फरक पडतो म्हणा!

शुभेच्छा!