झोपलो मी काय मजला याद नाही(विडंबन)

Submitted by येऊकामी. on 2 February, 2013 - 05:44

गझल मुळप्रेरणा http://www.maayboli.com/node/40717

झोपलो मी काय मजला याद नाही!
ढेकना, तुझा डासांशी वाद नाही!!

ढेकणांचे का वर्णावे क्रोर्य आम्ही?
खाज नसलेला कुणी उस्ताद नाही!

धावता सुस्तावला तू मस्तमौला....
तेवढी खराब मी औलाद नाही!

सारखा कानास हेड्डफोन आहे!
मात्र कानाशी कसा गोंगाट नाही?

रोग डोक्याचा कसा त्यांनाच होतो?
ज्या बिचा-यांना गझलेचा नाद नाही!

खालचे खोटे भलेही ना विचारो....
उच्चदुखाची खरी मोताद नाही!

झोपचक्राचे नियम नसतात काही;
तू झोप्या, का लावली वासलात नाही!

मायबोली छान ही जिंदाड झाली?
डुकर्या डासास सुद्धा माज नाही!

वाहवा साष'टांग' त्यांना रोज द्यावी?
डोकं नाही, खोकं आहे,... वाद नाही!

काय मज कळणार गोडी जहालाची?
रोजचा अद्याप मी वस्ताद नाही!

द्यायचे ते एकदा दे वून टाका....
ह्या यड्याची एकही फियाट नाही!

Group content visibility: 
Public - accessible to all site users